या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 असा एखादा विषय मनात घर करून हळूहळू निश्चित होऊ लागला की {nop}}

मग त्या विषयाची अनुकूलता दिसू लागते. त्या अनुषंगाने मग 'मुक्तमयूरांची

भारते' हा डॉ. ना. गो. नांदापूरकराचा प्रबंध आठवला आणि खात्री पटलीं.

आपल्या मनात घोळणारा अभ्यासविषय एकाकी नाही.

 मुक्तेश्वर - मोरोपंताच्या महाभारतांचा, म्हणजे प्राचीन मराठी वाङ्मयाच्या

प्रांतीतील दोन थोर साहित्यिकांच्या महाभारतावरील रचनांचा असा तुलनात्मक

अभ्यास प्रबंधासाठी सादर झालेला आहे. यातूनच खात्री पटली की आपला

'महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्याचा अभ्यास हा प्रबंधासाठी

आपण निवडलेला संशोधन विषय मान्यता प्राप्त करू शकेल.

 आपण एक महाभारत महाकाव्य, संस्कृतीचे संचित, राष्ट्रीय महाकाव्य

अभ्यासणार आहोत. आयुष्यभर कोणालाही पुरून उरेल असा विषय आपण

निवडला याचे समाधान वाटले. निदान या निमित्ताने आपण आपल्या भारतीय

संस्कृतीच्या एका मानदंडाकडे वळलो असे वाटले. पण प्रारंभी वाटलेला हा आत्म-

विश्वास प्रत्यक्षात टिकवून धरणे काहिसे अवघड असते. अभ्यासाच्या एकून

पसायात जेव्हा आपण अडकतो तेव्हा काहीतरी न पेलवणाऱ्या गोष्टींच्या नादी

लागलो असे वाटते. आपल्याला आपली कुवत नीट कळत नाही असे विलक्षण

दडपण काम सुरू झाल्यावर वाटू लागते.

 विषयाची व्याप्ती आपण साधन सामग्री जमवावी तशी ती अधिकच वाढत

जाते. आपण आता कमी पडणार, शेवटपर्यंत पोहचू शकणार की नाही असा

संभ्रम मनात निर्माण होतो. महाभारतावर आधारित साहित्यकृतींची संख्या

भरपूर आहे. ती प्रत्यक्ष अभ्यासाची साधने झाली, पुन्हा त्यावरील संदर्भग्रंथांची

यादीही फार मोठी बनली. शिवाय मूळ महाभारत, कथा, काव्य, नाटक, कादंबरी

इत्यादी अनेक वाङ्मय प्रकारातील लेखन आणि श्रीकृष्ण, भीष्म, धर्मराज, अर्जून

कर्णं, अश्वत्थामा आदी व्यक्तींवरील लेखन हे सारेच एकत्र तेही सुसूत्रपणे कसे

आणावे असा प्रश्न पडला.

 अशावेळी संबंधित क्षेत्रातील मातब्बर मान्यवरांशी चर्चा करणे सोयीचे

असते. त्या निमित्ताने मान्यवरांचे मोठेपण लक्षात आले की ते आनंदाने मार्ग-

दर्शनास तयार असतात. आपला भरपूर वेळही त्यासाठी देण्याची त्यांची तयारी

असते. पण हे सारे जरी खरे असले तरी संशोधकाने शेवटी 'करावे मनाचे '

हेच खरे.

६६             आलेख