या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





नाही. व्यासांना पाचारण केल्यानंतर अंबिका स्वतः ऐवजी एक दासीला सामोरे

करते, त्यातूनच नियोग पद्धतीने दासीपुत्र म्हणून विदुर जन्मला. विदुर अत्यंत

बुद्धिमान होता. धृतराष्ट्राचा प्रज्ञावंत महामंत्री म्हणून त्याला मानाचे स्थानही

लाभले आहे. विदुराविषयी जेवढया आत्मीयतेने पाहायला हवे तसे पाहिले जात

नाही म्हणून तो महाभारतातील एक अलक्षित किंबहुना अत्यल्प लक्ष केंद्रित

झालेली व्यक्तिरेखा आहे. विदुराची नीती, तत्वज्ञान, उपदेश, मार्गदर्शन, महा-

भारतात विपुल प्रमाणात आहे. पुष्कळदा विदुर मध्यस्थी करतांना, स्पष्टपणाने

प्राप्त परिस्थितीची आणि कर्तव्याची जाणीव करून देतांना दिसतो. जतुगृहदाह

प्रसंगी गुप्त भुयारातून निघून जाण्याची कल्पना तोच पांडवांना सुचवितो आणि

धृतराष्ट्राला दुर्योधन हा सुलक्षणी नसल्याने पुत्र असूनही त्याचा त्याग करण्याचा

सल्ला देतो. कुंतीचे आणि पांडवांचे संरक्षण करतो. त्यांना पदोपदी जपतो.

श्रीकृष्णालाही शिष्टाईच्या वेळी विदुराकडेच पाहुणचार घेणे आवडते, आणि

प्रत्येकवेळी त्याचे अस्तित्व सुखावह वाटते. धृतराष्ट्राला दिलासा देणारे ठरते.

कधीकधी त्याने दिलेला चोख सल्ला पुत्रमोहाने आंधळचा झालेल्या धृतराष्ट्राला

मानवत नाही.

 महाभारतातील व्यक्तिरेखा मानवी पातळीवरून चित्रित झाल्या आहेत.

इहतत्वाचा स्पर्श ज्या व्यक्तींना झालेला आहे त्यात कर्णं, एकलव्य, अश्वत्थामा,

विदुर यांचा समावेश होतो. विदुराच्या पूर्वजन्माची कथा अद्भुत असली तरी

जीवन कहाणी तर्काला पटणारी मानवी आहे. विदुर विद्वान असूनही दासीपुत्र

असल्यामुळे त्याला जीवनात हवा तो सन्मान मिळालेला नाही. महाभारतात अनेक

वाईट लोकांचा विनाश दाखविला आहे. लहान मोठ्या गोष्टींचा नायनाट दर्श-

विला आहे. मूल्यांसाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि मूल्ये झुगारून देणाऱ्या अशा

दोहोंचाही विनाश होतो, हे महाभारताचे आगळे दर्शन आहे. गांधारी, कर्ण, कुंती,

विदुर, अभिमन्यू, एकलव्य, दुर्योधन, घृतराष्ट्र आदि व्यक्तिरेखांच्या चित्रणातून

हेच सूचित होते. शोकात्म भावनेची लय हीच आणि हाच Tragic Experience

म्हणता येईल. विदुराच्या सदाचाराचा आणि निर्भय वक्तृत्वाचा एक दबदबा

संपूर्ण महाभारतात जाणवतो. प्रत्येक वेळी धृतराष्ट्र त्याचा सल्ला घेतांना दिसतो.

विदुर धृतराष्ट्राच्या इच्छेविरूद्ध तोंडावर कठोर बोलायला कचरत नसे. विदुराच्या

स्वभावात मिस्किलपणाही जाणवतो, द्रोपदी स्वयंवरानंतर घाईघाईने धृतराष्ट्र

विचारतो, कोणी द्रोपदी जिंकली ? यावर विदुर म्हणतो 'कौरवांनीच !! मागाहून

खुलासा करतो कौरववंशीय अर्जुनाने !

 विदुराची योग्यता ओळखून धृतराष्ट्र त्यावर तरीही प्रेम करी प्रसंगी क्षमाही

मांगे. पण राज्यलोभ आणि पुत्र मोहानें तो पुरता आंधळाच होता. म्हणूनच त्याला


आलेख            ८६