पान:इंग्लंडला पडलेला पेच.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ मराठी वाचकवर्गासही मुळींच कल्पना नाहीं असें म्हणतां येणार नाहीं. तथापि - प्रस्तुतसारख्या महत्वाच्या विषयाचा सुव्यवस्थित व पद्धतशीर असा अभ्यास करणारास मि. वेव यांचे जितके अधिक लेख एके ठिकाणीं वाचावयास मिळतील तितकें अधिक चांगलें हें उघड आहे. व याकरितां आमच्या एका स्नेह्यांनी 'ब्रिटन्स डायलेमा ' या नांवाच्या मि. वेव यांच्या पुस्तकाचें हें भाषांतर प्रसिद्ध केलें आहे. हा विद्यार्थिवर्गावर त्यांचा उपकारच म्हटला पाहिजे. मूळ पुस्तकांतील विषय महत्वाचा व किंचित् भानगडीचा असल्यामुळे मि. वेब यांच्या पुस्तकांतील तुटक आधार घेऊन लिहिण्यापेक्षां त्यांच्या समग्र पुस्तकाचें सरळ व सुबोध भाषांतर करण्याची कल्पना कोणासही खचित अधिक ग्राह्य वाटेल. मि. वेब यांची विचार- सरणा सरळ असल्यामुळे वाचकांस विषय नीट समजून त्याची गोडी लागेल यांत शंका नाहीं. आपला इतर व्यवसाय संभाळून निर्विकार मनानें व पद्धतशीररीतीनें देशस्थितीच्या एका बाबतीत भाषांतरकर्त्याने लक्ष घालून आपल्या शेंकडों देशवांधवांजवळ एरव्हीं नसलेलें साधन ह्या भाषांतरद्वारां उपलब्ध करून देऊन या विषयाचा अभ्यास करणायांस चांगली मदत केली याबद्दल त्याचे आभार मानून ही प्रस्तावना पुरी करतों. न० चिं० केळकर.