पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ याचा यापेक्षा अधिक मान भंग करावयाकरितां कामन्स सभेने विचार ठरविला की, अर्ल पीटर्बरो यानें स्पेन दे- शांत सरकार काम चांगले केलें, ह्मणून त्याचा सन्मान करावा. ड्युक मार्लबरो यानें फ्लांडर्स देशांत पराक्रम केला, परंतु त्यास हा सन्मान प्राप्त झाला नाहीं; आणि लार्ड कीपर यानें अर्ल यास तो सन्मान समजाविते वेळेस मार्लबरो याचे लोभी स्वभावाचा अपमान मात्र जाणविला. या राज्याच्या प्रारंभ विग रीतीनें झाला होता, परंतु तिचें आतां कांहींच राहिले नाहीं. एक युद्ध मात्र रा हिलें; त्यास पुढें विशेष खर्च लागूं लागला, ह्मणून अमा त्यांनी निश्चय केला की, कसें तरी करून तें बंद करावें; परंतु या वेतास ड्युक मार्लबरो कांहीं विघ्न करील, ह्मणून प्रथम त्यास काढावें, असे त्यांनी योजिलें. असे करण्यास ही संकट होते, तें हैं की, डच लोकांचा ड्युक यावर सर्व भरंवसा होता, ह्मणून तसे त्याचें वांकडे केले असतां त्या लोकांस राग येईल अशी शंका होती. याकरितां ते संधि पाहात राहिले. पुढे तो युद्धांतून परत आल्यानंतर त्यावर आरोप ठेविला कीं, कोणी एक इस्त्राइल यानें फौ- जेस रोटी लागेल ती पुरवावयाचा मख्ता केला होता. त्याजवळून प्रतिवर्षी यानें सहा हजार पौंड लांच घेतला, यावरून राणीनें त्याला सर्व कामकाजावरून दूर केलें; कां कीं, त्यास पाडावें हें पूर्वीच योजिलेलें होतें. याचें काम निघण्याचे कारण लांच घेणे नव्हें, ही गोष्ट खरीच, परंतु हे कारण वाजवी असें मानिले पाहिजे. तेव्हां प्रैअर ह्मणून पुरुष होता, ज्याची प्रसिद्धि राज्य - मसलती अशी नव्हती, कवि अशी होती; त्यास कांहीं