पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ तें घ्यावे इतकें बाकी राहिले. तें शहर क्यानडा प्रांताची राजधानी; तें सुंदर बांधलें होतें, व त्यांत वस्ती फार हो- ती. त्या लढाईंत अरमाराचा सरदार आङ्मरल सांडर्स नेमिला होता; व जमिनीवरून वेढा घालण्याचे काम जनरल वुल्फ यास सागितले होते. त्याचें वय पसतीस वर्षांचे आंत असतां बहुत प्रसंगी त्यानें पराक्रम केला होता. त्यांत लुइसवर्ग याचे वेढ्यांत फार केला होता. त्यास कुळाचे किंवा नात्याचे आश्रयावांचून के.. वळ गुणांनींच अधिकार मिळाला होता. अमेरिका देशांत पूर्वीपासून लढाई फार क्रूरपणानें चालिली होती. परंतु ही चाल वाईट असे समजून पुढे दयेनें लढाई करावी असा वुल्फ यानें निश्चय केला. तें विबेक शहर मोठे नदीचे कांठीं होतें, त्याचे सभोवते तट होते, तो देशच मुळचा बळकट होता, नदीची राखण करावयासाठीं शत्रूनी बहुत गलबतें मिळविली होतीं, व ते- थील राहाणारे रानवट लोकांच्या टोळ्या नेहेमी इंग्लिश लोकांसभोवती फिरत होत्या. हीं सर्व संकटें एकीकडे मोठे इ०स० १७५९ पाहून शूर सरदाराचीही हिंमत खचेल. तो किला घेण्याचा एकच उपाय होता; तो असा की, रात्री शह- राचे खाली लोक उतरावे, आणि त्यांनी नदीचे कांठावर चढून शहराचे मागून हल्ला करावा. परंतु अशासही (अडचणी होत्या. नदीचा वेग जलद; कांठ उतरता; त्यावर रखवाली फार; आणि जमीन अशी उतरती होती कीं, तीवरून दिवसासही चढतां येऊं नये. इतक्या गोष्टी असतां इंग्लिश यांचे सरदारांचा धीर कमी झाला नाही. कर्नल हो साहेब लैटइनफांत्री व हैलांडर लोक वरोवर