पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ होती. त्यास पार्लमेंट सभेमध्ये केंब्रिज शहरचा सभा- सद नेमिला होता, त्यामध्यें वक्तृत्वाची साधनें नव्हतीं, कारण त्याचे शरीर कुरूप, नेसणें अव्यवस्थित, व बोलणे कर्कश, लांबट, संशयित, आणि घावरें असे. स्वाभाविक जे गुण त्यामध्ये कमी होते, ते त्यानें आस्था आणि उद्योग यांहीं करून पूर्ण केले. यामध्ये शौर्य उत्कृष्ट, आणि वि चार, हे गुण होते. तशीच त्याची आपले पक्षाविषयीं खातरी होती ह्मणून तो हळू हळू चढत चढत शेवटीं फे- फक्स याचे हाताखालीं लेफ्टेनंट जनरल है पद पा वला, परंतु सर्व फौजेवर हुकूम त्याचाच होता. पुढें फौजेच्या मनांत आले की, आपणही एक स्वतंत्र समुदाय आहों. ते ह्मणूं लागले कीं, आह्मी सर्व लोकांस निर्भय केलें, असे असतांही आह्मास इंग्लिश लोकांची स्वतंत्रता नाहीं. याकरितां त्यांनी एक लश्करी पार्लमेंट करावें, असें योजून त्याकरितां सर्व पलटणींतले मुख्य मुख्य सरदार आणि शिपाई हे नेमिले. त्यांत कावेल यानें आपले नाव मुद्दाम घातले, कारण कीं, फौजेस फिता- वून कांहीं तरी ढवाळी करावी. इकडे असे वर्तमान असतां हतभाग्य राजा चार्लस हों- बीक्यास्तल यावर कैदेत तसाच होता. त्याचें अंग ज्या पक्षास असेल त्या पक्षास कांहीं वजन येईल, असे सम जून काम्वेल यानें वेत केला की, त्यास धरावा. पुढे जास नामें एका पुरुषानें पांचशे स्वार बरोबर घेऊन होंबीक्या- स्तल याजवळ जाऊन राजास केंब्रिज शहराजवळ त्रि- शेहीथ ठिकाणी फौजेच्या स्वाधीन केलें. दुसरे दिवशीं