पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ वसा दाखविला. तो लाड यांनीं तिरस्कार करून असत्य असा ठरविला. ड्युक यार्क याचा सेक्रेतारी कोल्मन ह्मणून होता, त्यास पुढे प्रथम चौकशीकरितां उभे केलें. वेड्लो यानें शपथ केली की, यास जेविट यांचे सरदाराने सनद पाठविली; त्यांत मजकूर कीं, तुझास आह्मी पोप यांचा मुख्य सेक्रेतारी नेमतों; आणि दुसरी गोष्ट की, यानें रा जाच्या वधाविषयीं संमती दिली होती. या लुच्चांनी त्या- वर आरोप घेतला, सबब शासन ठरविलें; पुढे दोनही सभां- तील कितीएक सभासदांनी त्यास सांगितले की, काय मज- कूर असेल, तो तूं कबूल हो, ह्मणजे तुजविषयी आह्मी रज- बदली करूं; परंतु त्याने कांही तशी लबाडी केली नव्हती, ह्मणून शेवटीं लवाडी करून जीव वांचवावा हैं, यास योग्य वाटेना. त्यानें शेवटपर्यंत मी निरपराधी ह्मणत ह्मणत सर्व दुःखें सोसलीं. कोल्मन याचे शासन झाल्यानंतर अयर्लंड, पिकरिंग आणि ग्रोव या तिघांची चौकशी झाली. त्यावर अन्याय ठरला, परंतु त्यांचा शिरच्छेद झाला; तेथेंही ते आपण निर पराधी अशी गोष्ट वोलत होते. तथापि ते जेसविट होते, ह्मणून कोणास दया आली नाहीं. मैल्सप्रान्स ह्मणून एक होता, त्याचे साक्षीवरून हिलग्रीन आणि बेरी या ति घांनी गाड्फ्रे यास मारिलें, असा आरोप ठेविला. बेड्लो यानें, आणि प्रान्स यानें जें सांगितले, ते एकमेकाशी कांहींच मिळाले नाहीं; आणि दुसऱ्यांचे सांगण्यावरू त्या दोघांचेही सांगणे खोटे पडले; तथापि ते सर्व व्यर्थ होऊन त्यांस शासन ठरवून शिरच्छेद केला. त्यांतून यद्यपि