पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ हालंड देशांत पळाला होता, त्यास धरून आणून तीच अवस्था केली. लार्ड एसेक्स यास किल्यावर टाकिलें होतें, त्याचा गळा कापलेला असा तो खोलींत सांपडला; परंतु त्यानें स्वेच्छेनें तें केलें, किंवा कोणी द्वेवाने त्याचा जीव घेतला, याचा आतां स्पष्ट शोध लागत नाहीं. या राज्यांत जीं बंडे झाली त्यासंबंधी शेवटचा मारिलेला हा. त्या काळी चार्लस राजाचें राज्य अतिशय कर रीतीनें चालत असे; तसें युरोप देशांतले कोणते राजाचे नव्हते; परंतु हे लोकांचे दैव ह्मणावें कीं, तो त्याचा क्रूरपणा फार दिवस राहिला नाहीं. त्याला अकस्मात् एक मूर्छा आली. रक्त काढल्यानें अणखी कांही दिवस तो जीवंत राहिला, आणि पुढे मृत्यु पावला. त्या वेळेस त्याचे वयास एकुण साठ वर्षे होती, आणि त्यानें पंचवीस वर्षे राज्य केले. तो दुखणेकरी असतां कित्येक धर्मपक्षी त्याजवळ गेले, त्यांवि षयीं त्यानें फार अनास्था केली. पुढे रोमनक्याथोलिक मताचे त्याजवळ आगिले, तेव्हां त्यांचे हातानें त्याचा शे- वटचा संस्कार झाला. प्रकरण ३२. द्वितीय जेम्स राजाची कथा. संन् १६८५ पासून १६८९ पर्यंत. चार्लस मेल्यानंतर त्याचा भाऊ, द्वितीय जेम्स राजा हा किताब धारण करून सिंहासनारूढ झाला. त्याची आई पोप मतानुसारी होती, ह्मणून त्यास त्या मताचा अति- शय अभिमान होता. तो सर्व राजचिन्हासहवर्तमान रो-