या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ श्लोक. स्त्रीवृंदें ही प्रार्थना दीन केली मित्रांनीं ती संगतीं आयकीली; सोडोनी तैं मंडपाला निघाले, जावोनीयां इंदिरेपाशिं ठेले. १० बैसे एका उच्चशा आसनीं ती, सौंदर्याची शोभते पूर्ण मूर्ती, चालें बोलें रम्य संतोषदायी साजे साया कांचनीं दिव्य आई. ११ पायांपाशीं व्याघ्र निश्चेष्ट होते दोघे तेथें, इंदिरेनें स्वहस्तें होते बाल्यापासुनी वाढवीले, तैं तीच्या स्वाधीन ते पूर्ण झाले. १२ ब्रह्मांड हें हुडकितां जिस जोड नाहीं, जी सांठवी बहुकळा अपुल्या सुदेहीं, स्त्री-उन्नतीविण दुज्या नचि वासनांला चित्तीं धरी; अशि सती भुलवी जगाला. १३ नखशिखान्त दिसे बहु गोजिरी निजरूपीं तशिही गुणिं सुंदरी; त्यजुनि आसन ती मग मावली जवळि येउन त्यांप्रत पावली. १४ अभिमुख उभि राहे दिव्य ती इंदिरा हो, नृपसुत मनिं बोले, दीर्घ ही काळ राहो ! सुखि बहु मनिं झाला पाहुनी अंगना ती, चिर मुख अनुलक्षी, प्रेम त्या नेत्रपातीं. १५