पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक आरोग्य समलिंगी जोडीदारांनी संभोगाच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्यात शरीराची स्वच्छता व जबाबदार लैंगिक वर्तन. शरीराची स्वच्छता शरीरस्वच्छतेच्या दृष्टीने दररोज सर्वांगाला साबण लावून अंघोळ करावी. पुरुषांच्या शिश्नमुंडावरचं जे कातडं असतं (fore-skin) त्याच्या आतल्या भागात एक स्त्राव येतो. तो वाळल्यावर त्यांची एक पांढरी पूड होते (स्मेगमा). ही पूड जास्त जमा झाली तर त्यानी दुर्गंधी येते म्हणून अंघोळीच्या वेळी शिश्नमुंडावरचं कातडं मागे करून साबणाने व पाण्याने शिश्नमुंड दररोज धुवावं. काही पुरुषांचं शिश्नमुंडावरचं कातडं खूप टाईट असतं. अशी व्यक्ती जर इनसर्टिव्ह भूमिका घेऊन गुदमैथुन करणार असेल, तर हे कातडं मागे सरकण्यास त्रास होतो, दुखतं व संभोगास अडचण येते. याला फायमॉसिस म्हणतात. शिश्न उत्तेजित झाल्यावर आपल्या शिश्नमुंडावरचं कातडं सहज शिश्नमुंडावरून मागे येतं का हे पहावं. जर मागे सरकत नसेल, त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जर फायमॉसिस असेल तर डॉक्टरांना एक छोटी शस्त्रक्रिया करून शिश्नमुंडावरचं कातडं काढून टाकता येतं. याला सुंता म्हणतात. जबाबदार लैंगिक वर्तन गुप्तरोग गुप्तरोगबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केल्याने गुप्तरोगाची लागण त्याच्या लैंगिक जोडदाराला होऊ शकते. गुप्तरोगांची लक्षणं पुरुष / स्त्रियांसाठी- जननेंद्रियांवर (योनी, लिंग, वृषण, संडासाच्या जागी, जांघेत) फोड येणं. हे फोड विविध प्रकारचे असू शकतात (दुखणारे, न दुखणारे; कोरडे, पाण्याने भरलेले; एक किंवा अनेक; छोटे किंवा मोठे); जननेंद्रियांवर जखमा होणं; योनी/लिंगाद्वारे दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणं; संडासाद्वारे रक्त जाणं; लघवी करताना जळजळ होणं. फक्त स्त्रियांसाठी- ओटीपोटात दुखणं. जर मागच्या दोन महिन्यात असुरक्षित संभोग झाला असेल व यातली काही लक्षणं दिसली तर ती गुप्तरोगाची लक्षणं असू शकतील. यातील अनेक लक्षणं इतर इंद्रधनु... १०२