पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोष्टींमुळेही असू शकतात उदा. संडासाच्या जागी मूळव्याधीचे फोड येऊ शकतात, जननेंद्रियांवर उष्णतेने फोड येऊ शकतात, लघवीला जळजळ अनेक कारणांनी होऊ शकते. म्हणून अशी लक्षणं दिसली की तो गुप्तरोग आहे असा आपणच तर्क लावू नये. ही लक्षणं दिसली की, लगेच डॉक्टरांना भेटावं. आजार अंगावर काढू नये. जाणकार गुप्तरोगतज्ज्ञ किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घ्यावेत.

  • असुरक्षित संभोगाबद्दल खरी व संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्यावी. (कोणत्या

प्रकारचा असुरक्षित संभोग झाला होता- योनीमैथुन / मुखमैथुन / गुदमैथुन; असुरक्षित संभोग करून किती दिवस झाले इ.) चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली तर डॉक्टरांकडून चुकीचं निदान होऊ शकतं. डॉक्टरांनीही संवेदनशीलता दाखवावी. अपमानास्पद वागणूक देऊ नये. इतर रुग्णांना ज्या दर्जाची सेवा दिली जाते त्याच दर्जाची सेवा याही रुग्णांना द्यावी.

  • औषधांचा कोर्स पूर्ण करावा. अर्धवट सोडू नये.
  • ज्या व्यक्तीला गुप्तरोग झाला आहे त्याचे जे जोडीदार आहेत (स्त्री किंवा पुरुष )

त्यांना गुप्तरोगाची लागण झाली आहे की नाही हे डॉक्टरांकडून तपासावं. जोडीदाराला जर गुप्तरोगाची लागण झाली असेल तर जोडीदारानीही औषध घेणं जरुरीचं आहे. नाहीतर बाधित व्यक्तीचा आजार बरा झाल्यानंतर जर त्यानी परत त्याच्या बाधित जोडीदाराबरोबर असुरक्षित संभोग केला तर गुप्तरोगाची लागण परत होऊ शकते.

  • कंडोमशिवाय संभोग करू नये.

एचआयव्ही/एड्स एचआयव्हीबाधित पुरुषाबरोबर दुसऱ्या पुरुषाने असुरक्षित गुदमैथुन किंवा मुखमैथुन केला तर एचआयव्ही विषाणु एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या रक्तातून किंवा वीर्यातून जोडीदाराच्या शरीरात प्रवेश करू शकतो. (जोडीदारांमध्ये दोघंही एचआयव्हीबाधित नसतील तर एकमेकांशी असुरक्षित संभोग करून एकमेकांपासून एचआयव्हीची लागण होवू शकत नाही. एचआयव्हीची लागण होण्यासाठी जोडीदारातल्या एकाला एचआयव्हीची लागण असणं अवश्यक आहे.) लागणीची शक्यता किती आहे हे कोणत्या प्रकारचा असुरक्षित संभोग झाला आहे यावर अवलंबून असतं. जर एका गुप्तरोगबाधित व्यक्तीने एका एचआयव्हीबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केला तर, एचआयव्हीबाधित व्यक्तीकडून एचआयव्हीचा विषाणू सहजपणे गुप्तरोगाच्या जखमांतून गुप्तरोगबाधित व्यक्तीच्या आत शिरू शकतो व त्यामुळे गुप्तरोगबाधित व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता खूप वाढते. इंद्रधनु... १०३