पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुरक्षित संभोग शिश्नावर कंडोम चढवून गुदमैथुन / मुखमैथुन / योनीमैथुन केला तर जोडीदारांचे स्त्राव (रक्त, वीर्य, योनीचं पाणी) एकमेकांच्या शरीरात शिरत नाहीत व म्हणून जर त्या दोघांपैकी कोणाला गुप्तरोग किंवा एचआयव्हीची लागण असेल तर त्या पासून जोडीदाराला संरक्षण मिळतं. म्हणून दर संभोगाच्या वेळी व्यवस्थितपणे कंडोमचा वापर करणं महत्त्वाचं आहे. अनेकजण संभोगाच्या वेळी कंडोम वापरत नाहीत. 'कंडोमने पुरेशी मजा येत नाही', 'नैसर्गिक वाटत नाही' अशा सबबी सांगतात. काहीजणांना जोखमीच्या वर्तनातून आपल्याला एखाद्या लैंगिक आजाराची लागण होईल असं वाटत नाही. ही माहिती सैद्धांतिक वाटते, कल्पित वाटते. अनेकजणांचा 'असे रोग मला नाही होणार' असा फोल आत्मविश्वास असतो. हा आत्मविश्वास कोणत्याही शास्त्रीय माहितीवर आधारित नसतो आणि तो एक दिवस महागात पडतो. 'जोडीदार दिसायला चिकणा व तब्येतीने चांगला असल्याशिवाय त्याच्या बरोबर भी जातच नाही' किंवा 'माझ्याशिवाय तो कुठे जात नाही. त्यामुळे त्याला कुठलीही लागण नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे' असल्या भाबड्या विश्वासावर अनेक जण एचआयव्हीबाधित झाले आहेत. सुंता केलेल्या इनसर्टिव्ह पुरुषांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता कमी असते असं संशोधनातून दिसून येत असल्यामुळे सुंता झालेल्या काही समलिंगी इनसर्टिव्ह जोडीदारांनी सोयीचा समज करून घेतला आहे की कमी शक्यता म्हणजे शून्य शक्यता. असा चुकीचा अर्थ लावू नये. काहीजणांना सुरक्षित संभोगाची माहिती नसते. ते समजतात की, एचआयव्हीची लागण एचआयव्हीबाधित स्त्रीपासून होते, बाधित पुरुषापासून होत नाही. टीव्हीवर किंवा इतर माध्यमांमार्फत एचआयव्ही, कंडोमच्या ज्या जहिराती दाखवल्या जातात त्यात एका बाधित पुरुषापासून दुसऱ्या पुरुषाला असुरक्षित संभोगाद्वारे एचआयव्ही किंवा गुप्तरोगाची लागण होऊ शकते ही माहिती पुरवली जात नाही. समलिंगी संभोगाला समाजमान्यता नसल्यामुळे या विषयावरची माहिती विचारायला, मिळवायला लोकांना भीती, संकोच वाटतो. कायद्याने समलिंगी संभोग करणं गुन्हा असल्यामुळे, लैंगिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना समलिंगी संभोग करणाऱ्यांपर्यंत पोहोचणं अवघड जातं. या सर्व कारणांमुळे कंडोमचा वापर खूप कमी आहे. “ 'नॅशनल सेंटीनेल सर्व्हेलन्स' २००५ ची आकडेवारी दाखवतं की, एमएसएम समूहातील ८% पेक्षा जास्त व्यक्ती एचआयव्हीबाधित आहेत पण इतर लोकांमध्ये एचआयव्हीबाधित व्यक्तींच प्रमाण १% पेक्षा कमी आहे, असा अंदाज आहे.... 'नॅशनल बेसलाईन बिहेवियर सर्व्हेलन्स' २००२ ची आकडेवारी दाखवते की ६८.६% एमएसएम इंद्रधनु... १०७