पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समूहाला सुरक्षित संभोगाचे मार्ग माहीत आहेत पण त्यातले फक्त ३६% च कंडोमचा वापर करतात. " [34] कंडोम वापरायची योग्य पद्धत १) कंडोमच्या वेष्टनावरची कालबाह्य तारीख (Expiry Date) तपासावी. जर कंडोम कालबाह्य झाला असेल तर तो शक्यतो वापरू नये. दुसरा कालबाह्य न झालेला कंडोम वापरावा. दुसरा कंडोम उपलब्ध नसेल तरच कालबाह्य झालेला कंडोम वापरावा. २) जर कालबाह्य तारीख (Expiry Date) वाचता येत नसेल, किंवा पाकिटावर छापली नसेल तर कंडोम पाकिटात सरकवायचा प्रयत्न करावा. तो सहज सरकत असेल तर कंडोम वापरण्यास हरकत नाही असं समजावं. जर कंडोम सहजपणे सरकत नसेल तर पाकिटातील वंगण वाळल्यामुळे कंडोम खराब झाल्याची शक्यता असते. इतर कोणता कंडोम उपलब्ध नसेल तरच हा (जुना) कंडोम वापरावा. ३) कंडोमचं पाकीट फाडायच्या अगोदर पाकिटातील कंडोम एका बाजूला सरकवावा व दुसऱ्या बाजूनं (ज्या बाजूला कंडोम नाही) पाकीट फाडावं. म्हणजे पाकीट फाडताना तुमचं नख लागून कंडोम फाटणार नाही. ४) कंडोम पाकिटातून काढल्यावर त्याच्यावर फुंकर मारून तो कोणत्या दिशेने उलगडायचा हे बघून घ्यावं. ५) कंडोमच्या टोकात हवा साठलेली असू शकते. तशीच हवा ठेवून जर कंडोम शिश्नावर चढवला तर संभोग करताना त्या हवेवर दाब येऊन कंडोम फाटू शकतो. कंडोम फाटण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. असं होऊ नये म्हणून कंडोमचं टोक चिमटीत पकड़ावं म्हणजे त्यातली हवा बाहेर पडेल व टोक चिमटीत तसंच पकडून कंडोम शिश्नावर चढवावा. इंद्रधनु... १०८ PR