पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६) शिश्न पूर्ण ताठ झाल्याशिवाय कंडोम चढवू नये. अन्यथा तो शिश्नावर नीट बसत नाही. ७) कंडोम पूर्णपणे चढवावा. कंडोम अर्धवट चढवला तर संभोग करतेवेळी तो निसटून येऊ शकतो. ८) संभोग करताना कंडोम फाटला अशी शंका आली तर लगेच थांबावं व शिश्न बाहेर काढावं. नवीन कंडोम चढवावा व मगच परत संभोग सुरू करावा. ९) वीर्यपतन झाल्यावर शिश्न ताठ असतानाच कंडोमची कड पकडून शिश्न व कंडोम बाहेर काढावा. १०) शिश्नावरून कंडोम काढताना शिश्न पहिल्यांदा गुदा (किंवा योनी) पासून बाजूला घ्यावं म्हणजे कंडोम काढताना गुदावर (किंवा योनीवर) वीर्य सांडणार नाही. ११) कंडोम काढल्यावर कंडोमला गाठ मारावी. १२) कागदात गुंडाळून कंडोम कचऱ्याच्या कुंडीत टाकून द्यावा. संडासात टाकू नये. संडास तुंबू शकतो. काहीजण सुरक्षिततेसाठी डबल कंडोम वापरतात. डबल कंडोम वापरायचे का नाही याबद्दल दुमत आहे. डबल कंडोम वापरले तर एकावर एक घासून कंडोम फाटायची शक्यता असते; वरचा कंडोम सटकून गुदात किंवा योनीत राहून जायची शक्यता असते. डबल कंडोम वापरल्याने संवेदनशीलताही कमी होते. तर काहीजण सांगतात की, डबल कंडोम वापरल्यावर जोडीदारांना मानसिकदृष्ट्या जास्त सुरक्षित वाटतं; डबल कंडोम वापरले व त्यातला एक फाटला तरी दुसन्यामुळे संरक्षण मिळतं. कंडोमचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मुखमैथुनासाठी फ्लेवर्ड कंडोम (वेगवेगळ्या चवीचे कंडोम - उदा. बनाना, चॉकलेट, स्ट्रॉबेरी इ.) मिळतात. या कंडोमच्या वंगणात फ्लेवर मिसळलेला असतो. याच्याव्यतिरिक्त इतर प्रकारचेही कंडोम्स उपलब्ध आहेत. रात्री चकाकणारे (Fluorescent), सुगंधयुक्त (Scented), रेघा (Ribbed), ठिपके (Dotted) असलेले कंडोम्स इ. वंगण (Lubricants ) गुदमैथुनात (किंवा योनीमैथुनात) घर्षणाने कंडोम फाटू म्हणून कंडोमला वंगण लावलेलं असतं. हे वंगण पाणी आणि ग्लिसरिन यांच्या मिश्रणाने बनविलेलं असतं. वंगणामुळे घर्षण कमी होतं, रिसेप्टिव्ह पार्टनरला त्रास कमी होतो व कंडोम फाटायची शक्यता कमी होते. इंद्रधनु... १०९