पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या वंगणानी घर्षण कमी होईल, शरीराला अपाय होणार नाही आणि ज्याच्यामुळे कंडोम फाटणार नाही असं वंगण वापरावं. गुदमैथुनासाठी कंडोमवर असलेलं वंगण पुरेसं नसतं. गुदमैथुनात घर्षण कमी व्हावं म्हणून काही पुरुष तेलयुक्त बंगणाचा वापर करतात. तेलयुक्त वंगणामुळे कंडोमची क्षमता कमी होते आणि कंडोम फाटण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून तेलयुक्त वंगण वापरू नये. तेल ( उदाहरणार्थ खोबऱ्याचं तेल), क्रीम (उदा. व्हॅसलिन इ.), तूप, साखरेचा पाक, आईसक्रीम, जॅम, ग्रीस व तेल / तूप वापरून केलेला कोणताही पदार्थ वंगण म्हणून वापरू नये. जे वंगण पाण्यानी बनविलेलं असतं (पाणीयुक्त, ज्यात तेल/तुपाचा वापर नाही) असं वंगण वापरावं. अशा वंगणामुळे कंडोमची क्षमता कमी होत नाही. फार्मसीच्या दुकानात केवाय् जेली (KY Jelly) म्हणून पाणीयुक्त वंगण विकत मिळतं. हे वंगण गुदमैथुनासाठी वापरावं. समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या काही संस्था या वंगणाची लहान पाकिटं स्वस्तात विकतात. बहुतांशी लोकांना केवाय् जेली ची किंमत परवडत नाही. त्याच बरोबर समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांची स्वस्तातल्या केवाय् जेलीची पाकिटं बहुतांशी लोकांना उपलब्ध होत नाहीत. जर केवाय् जेली उपलब्ध नसेल तर याला पर्याय म्हणून गुदमैथुन करताना थुंकी किंवा मध वंगण म्हणून वापरता येतं. जोडीदाराशी संवाद जर जोडीदारांमध्ये समानतेचं नातं असेल तर कंडोम वापराबद्दल बोललं जातं. नाहीतर जोडीदार सोडून जाईल, आपला त्याच्यावर विश्वास नाही अशी तो समजूत करून घेईल व रागवेल (कदाचित मारहाण करेल) या भीतीने अनेक जण जोडीदाराबरोबर कंडोम वापराबद्दल बोलत नाहीत. आपल्या सुरक्षिततेबद्दलचा संवाद जोडीदाराबरोबर होणं अत्यंत आवश्यक आहे. जोडीदाराला कंडोम वापरायचं महत्त्व समजून सांगावं. जर आपल्या पाकिटात कंडोम नसतील, किंवा कंडोम मिळवता आले नाहीत किंवा जोडीदार कंडोम वापरण्यास तयार नसेल तर हस्तमैथुन किंवा बॉडी सेक्स करून गरज भागवावी. काही झालं तरी असुरक्षित गुदमैथुन करू नये. जोडीदार नाराज होऊन निघून गेला तरी चालेल ही मनाची तयारी ठेवावी. लैंगिक सुखासाठी कितीही आतुर असलात तरी असुरक्षित संभोगाची जोखीम घेऊ नये. आपल्या पाकिटात एक तरी कंडोम सदैव बाळगावा. 'कंडोम नाही तर संभोग नाही' हे धोरण कायम राबवावं. O इंद्रधनु ११० P*