पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुरक्षित जागा/ ड्रॉप इन सेंटर (Safe Space / Drop in Centre) समलिंगी लोकांना घरी, कामाच्या ठिकाणी भिन्नलिंगी मुखवटा घालून वावरावं लागतं. आपण कोण आहोत हे इतरांना कळलं तर ते आपल्याला त्रास देतील, वाळीत टाकतील ही भीती त्यांच्या मनात कायम असते. ही कुठलीच ठिकाणं त्यांच्यासाठी सुरक्षित जागा होऊ शकत नाहीत. त्यामुळे समलिंगी लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गरज एका सुरक्षित जागेची असते. एक अशी जागा जिथे समलिंगी व्यक्तीला भिन्नलिंगी असण्याचा मुखवटा घालून वावरायची आवश्यकता भासणार नाही. जिथे मोकळेपणानं ती व्यक्ती कोणतंही दडपण, संकोच न बाळगता वावरू शकेल. इतरांशी बिनधास्त गप्पा मारू शकेल, इतरांचे अनुभव ऐकू शकेल, अशी जागा समलिंगी व्यक्तीला मिळणं त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असतं. एखादा तास जरी, अधूनमधून या जागेत घालवायला मिळाला मन् दडपण कमी होऊ शकतं. प्रतिभा घीवाला म्हणतात, "आपला रंग जसा जन्माआधी ठरलेला असतो तसंच लैंगिक प्रवृत्तीचं आहे. रंगासारखीच लैंगिकता बदलता येत नाही. ती स्वीकारावी लागते; पण हे करत असताना वैयक्तिक, कौटुंबिक; तसंच सामाजिक पातळीवर अनेक अडचणी येतात. खूप अडथळे पार करावे लागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणं कधीच सोपं नसतं. पण काही लोकांनी धीटपणे याचा स्वीकार केला आहे. अशा लोकांशी जरूर संपर्क साधावा. त्यांचा अनुभव आपणास उपयोगी पडेल. आपणास आधार मिळेल; तसंच जीवनास सामोरं जाण्यास सामर्थ्य लाभेल." [66] हा आधार संस्थेत मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त अशा संस्था इतरही सुविधा पुरवू शकतात- ग्रंथालय, सिनेमे दाखवण्याची व्यवस्था, काउन्सेलिंग / वैद्यकीय सुविधा, वकिलांचं मार्गदर्शन इत्यादी. समलिंगी विषयावरची माहिती, साहित्य फार ठिकाणी उपलब्ध नसतं. एखादं पुस्तक हाती लागलं तरी ते चटकन विकत घेता येत नाही. अनेक वेळा ते पुस्तक चाळायला घेणं सुध्दा अवघड असतं. पुस्तक जरी विकत घेतलं किंवा मिळवलं तरी ते लपवायचं कुठं? ते इतरांच्या हाती लागलं तर! “मी तुमचं 'पार्टनर' (समलैंगिकतेवर आधारित पुस्तक) विकत घेतलं. लपूनछपून ते वाचून काढलं. पण आता मला ते घरी ठेवणं रिस्की वाटतं. कुणाच्या हाती लागलं तर? त्यापेक्षा ते कचऱ्यात टाकून द्यावं, नाहीतर तुम्हाला ते परत करावं असा विचार केला. म्हणून ते तुम्हाला परत द्यायला आलो.” आला "मी तुमचं 'पार्टनर' पुस्तक प्रदर्शनात पाहिलं. वरच्या चित्रावरून मला अंदाज आणि हाती घेतलं. माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे मी ते विकत घेऊन घरी इंद्रधनु ११२