पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायचा प्रश्नच नव्हता. मी ते प्रदर्शनात दोन तास बाजूला उभं राहून वाचून काढलं.” जर संस्थेत समलिंगी विषयावरचं साहित्य असेल तर ते संस्थेतच निवांतपणे वाचता येतं. समलिंगी मुला/मुलींना मान्यतादर्शक प्रतिमा बघायला मिळणं मानसिक आरोग्यासाठी गरजेचं असतं. आपले प्रश्न, भावना समजूतदार, संवेदनशीलपणे मांडणारे सिनेमे, नाटकं बघायला मिळणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. हे सिनेमे अशा संस्था दाखवू शकतात, त्याच्यावर चर्चा घडवून आणू शकतात. लैंगिकतेच्या विषयाशी निगडित समस्या जाणकार, संवेदनशील काउन्सेलर समोर मांडता येतात. त्या प्रश्नावर काउन्सेलर तटस्थ वृत्तीने संवाद साधू शकतो. त्या प्रश्नाचे विविध पैलू क्लायंटच्या समोर मांडू शकतो. जर समलिंगी व्यक्तीला नैराश्य असेल, खूप मानसिक तणाव असेल तर काउन्सेलर त्याला संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवू शकतो. या संस्था गुप्तरोग, एचआयव्ही/ एड्स संदर्भात काऊन्सेलिंग, चाचणी, उपचारांच्या सुविधा पुरवू शकतात. समलैंगिकतेबद्दल संवेदनशील दृष्टिकोन बाळगणारे वकील जर संस्थेत असतील/ संस्थेशी निगडित असतील तर हे वकील गरज पडेल तेव्हा समलिंगी क्लाएंटस्ना कायद्याची मदत देऊ शकतात. संस्थांचे काही प्रश्न लैंगिकतेचे विविध पैलू आहेत. उदा. ट्रान्सजेंडर्स, ट्रान्ससेक्शुअल्स, इंटरसेक्स इ. जर लैंगिकतेच्या सर्व पैलूंवर संस्था चालवायची असेल तर नुसती समलिंगी लोकांसाठी ती चालवता येत नाही. फक्त समलिंगी लोकांनी संस्थेत यायचं, पण इतरांनी नाही असा नियम संस्थेला करता येत नाही. प्रत्येक गटाची एक वेगळी संस्कृती असते आणि या गटांमध्ये भेदभाव असतात. त्या सर्वांना एकाच सेफ स्पेसमध्ये / ड्रॉप सेंटरमध्ये सामावून घेणं अवघड होतं. इन समलिंगी लोक अनेक जातीतून, धर्मातून, आर्थिक परिस्थितीतून येतात. वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेल्या व्यक्तींना एकमेकांशी जमवून घेणं अवघड होतं. त्यात गटबाजी होण्याची शक्यता असते. इंग्रजीत बोलणाऱ्यांचा गट, मराठी लोकांचा गट, अमहाराष्ट्रीय लोकांचा गट, पुरुषी व्यक्तींचा गट, बायकी पुरुषांचा गट इ. असं दिसून येतं की हळूहळू ज्या गटाचे लोक जास्त प्रमाणात येतात तो गट सोडून बाकीच्या गटातले लोक नंतर येईनासे होतात. इतरांना त्या संस्थेत परकं वाटायला लागतं. इंद्रधनु ११३