पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या सुमारास एचआयव्हीबाधित व्यक्ती भारतात आढळल्या. लैंगिक शिक्षणाचा अभाव, एचआयव्ही/एड्सबद्दल गैरसमज या सगळ्यामुळे एचआयव्हीचा प्रसार वाढत होता. शरीरविक्री करणाऱ्या व्यक्ती, इंजेक्शनद्वारा नशा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये एचआयव्हीचा प्रसार होताना दिसला. समलिंगी संभोग करणान्या समाजात एचआयव्हीचा प्रसार झपाट्याने होत होता. पण त्याचबरोबर 'समलिंगी लोक भारतात कुठे आहेत?' असं विचारणारेही होते. १९८९ साली अशोक राव कवींनी मॉन्ट्रि आलमध्ये पाचव्या आंतरराष्ट्रीय एड्स कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. तिथे त्यांना दिसलं की एचआयव्ही हा फक्त समलिंगी लोकांचा रोग आहे असं मानून एचआयव्हीच्या संशोधनासाठी, माहिती पुरवण्याच्या उपक्रमांसाठी अमेरिकन सरकार (समलिंगीव्देष्ट्या धोरणांमुळे) पुरेसा पैसा देत नव्हतं. अनेक समलिंगी लोक एचआयव्हीबाधित होत होते आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावाने दगावत होते. हे बघून त्यांच्या मनात विचार आला की, जर अमेरिकेत ही स्थिती आहे तर भारतात काय होईल? या विचारानी ते सुत्र झाले आणि १९९० साली त्यांनी पत्रकारितेच्या नोकरीतून निवृत्ती घेतली. समलिंगी लोकांना सुरक्षित संभोगाचं ज्ञान देणं, त्यांना कंडोम पुरवणं हे महत्त्वाचं आहे असं जाणून त्यासाठी ते काम करू लागले. मुंबईत सेक्स साइटस्वर कंडोम्सचा पुरवठा करणं, वर्तमानपत्रातून समलैंगिकतेबद्दल लेख लिहिणं, मुलाखती देणं, एमएसएम लोकांसाठी सुरक्षित संभोगाची माहिती देण्याचे (HIV Prevention Projects) उपक्रम सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १९९४ साली त्यांनी मुंबईमध्ये 'हमसफर ट्रस्ट' संस्था सुरू केली. १९९५ साली 'हमसफर ट्रस्ट' व 'नाज फांऊडेशन इंटरनॅशनल' यांनी मुंबईमध्ये समलिंगी लोकांसाठी संमेलन भरवलं. मागच्या दशकात इतरही संस्था या विषयात कार्यरत झाल्या. बंगालमध्ये 'साथी', 'मानूष बांगला', 'स्वीकृति'; चेन्नईमध्ये 'स्वॅम', 'सहोदरन'; बंगलोरमध्ये ‘संगमा’; बरोड्यामध्ये 'लक्ष्य'; पुण्यामध्ये 'समपथिक’ इत्यादी. २००१ साली 'नाज फाउंडेशन, इंडिया' (नवी दिल्ली) नी लॉयर्स कलेक्टिव्हच्या आधारे दिल्ली हाय कोर्टात आयपीसी ३७७ कायदा बदलण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. मे २००१ मध्ये 'इलगा' आशिया (International Lesbian and Gay Association-Asia) ची मुंबईमध्ये परिषद झाली. २००६ मध्ये 'इन्फोसेम' (Indian Network For Sexual Minorities) ची स्थापना झाली. भारतातल्या समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांचं हे सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. इंद्रधनु... १९६