पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बिंदुमाधव खिरे हे पेशानी सॉफ्टवेअर इंजिनिअर. दहा वर्षं या क्षेत्रात काम केल्यावर २००० साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. २००२ साली त्यांनी समपथिक ट्रस्ट (पुणे) ची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे पुरूष लैंगिक आरोग्य केंद्र चालवलं जातं. समलिंगी, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स व्यक्तींच्या मानसिक शारीरिक आरोग्याच्या विषयावर काम केलं जातं. बिंदुमाधव खिरे यांची 'पार्टनर' आणि 'एचआयव्ही / एड्स, लैंगिक शिक्षण व लैंगिकता हेल्पलाईन मार्गदर्शिका' ही दोन पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत. ते स्वतः समलिंगी आहेत. हे पुस्तक त्यांच्या अनुभवातून व अभ्यासातून साकारलं आहे. लैंगिकतेबद्दल फारसं खुलेपणानं बोलण्याची पध्दत आपल्याकडे नाही. त्यामुळे चोरून-लपून वाचलेली मिळतील ती पुस्तकं व अलिकडच्या काळातील इंटरनेट यातून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही या विषयाबाबत प्रचंड गैरसमज व अंधश्रध्दा आढळून येतात. लैंगिकतेबद्दलंच इतकं अज्ञान तर समलैंगिकतेबद्दल तर बोलायलाच नको. या संदर्भात एक कुतुहल - उत्सुकता तर असतेच पण खूप प्रश्नंही असतात. लैंगिक कल म्हणजे नेमकं काय ? समलैंगिकता नैसर्गिक का अनैसर्गिक ? समलैंगिकतेबद्दल वैद्यकीय दृष्टिकोन काय आहे ? समलिंगी समागम करणं गुन्हा आहे का ?

  • गे, लेस्बियन, होमोफोबिया, एमएसएम म्हणजे काय ?
  • समलिंगी व्यक्तीला मूल दत्तक घेता येतं का ?

समलिंगी समाजाला कोणते अधिकार हवे आहेत ?

  • हे पाश्चात्यांकडून आलेलं फॅड आहे का ?

अनेक शंका, मनातले गोंधळ दूर करणारी शास्त्रशुध्द माहिती या पुस्तकात दिली आहे. अनुभवाधारित या माहितीमुळे समलिंगी व्यक्तींची होणारी कोंडी-कुचंबणा बऱ्याच प्रमाणात दूर होईल. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळून एक खुलेपणा प्राप्त होईल.