पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुघल साम्राज्य मुघल आक्रमणं १० व्या शतकात सुरू झाली. ते हळूहळू उत्तर भारतात स्थायिक व्हायला लागले. १० ते १८ शतकाच्या कालखंडात काही समलिंगी प्रेमाचे, आकर्षणाचे उल्लेख आढळतात. यातली काही उदाहरणं खाली दिली आहेत. जहिरुद्दिन महोम्मद (बाबुर) (१४८३-१५३०) आणि बाबुरी- तरुणपणी बाबुरची नजर बाबुरीवर पडली आणि तो त्याच्या प्रेमात पडला. त्या प्रेमावर बाबुरनी काव्य रचलं. (बाबुरनामा) [10] May none be as I, Humbled and Wretched and love-sick; No beloved as thou art to me, cruel and careless. दर्गा कुली खानच्या नोंदी (दिल्ली-इ-मुरक्का)- दर्गा कुली खान जून १७३८ ते जुलै १७४१या कालावधीत दिल्लीमध्ये स्थायिक होते. त्यांनी तिथल्या संस्कृतीचं वर्णन केलं आहे. त्यात समलिंगी आकर्षणाचे उल्लेख आढळतात. [11] अबू फझलचा अकबरनामा- शहा कुली खान महाराम्सचं कुबुल खान या युवकावर प्रेम होतं. अकबराला हे पसंत नव्हतं व त्यांनी त्यांची नापसंती व्यक्त केली. शहा ऐकेनात म्हणून शेवटी अकबरानी कुबुल खानला शहापासून दूर केलं. शहाला त्याचं इतकं दु:ख झालं की त्याने संन्यास घेतला. कालांतराने तो परत अकबराकडे आला. [12] काही कवींनी 'होमोइरॉटिक' काव्य रचलं आहे. उदा. अबरू, मीर-ताकी-मीर इ. [13] ब्रिटिश साम्राज्य १८५७ च्या उठावानंतर राणी व्हिक्टोरियाने भारताचा कारभार हाती घेतला. १८६० साली भारतीय दंडसंहिता तयार करून लागू करण्यात आली. या संहितेत ३७७ कलमाने प्रौढांनी राजीखुशीने केलेला समलिंगी संबंध गुन्हा बनला. तो आजतागायत भारतात गुन्हा आहे. वरील उदाहरणं दाखवून देतात की, समलैंगिकता व इतर लैंगिक विविधता ही काही पाश्चात्त्य लोकांपासून आली नाही. ती आधीही इथे होती. भारतीय समाजाने या विषयाकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याच्याबद्दल न बोलून त्याचं अस्तित्व नाकारलं. अगदी २०व्या शतकापर्यंत हीच मानसिकता दिसते. अॅलन डॅनिलाऊ यांनी 'कामसूत्र' या ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर केलं, त्यात त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे की- महात्मा गांधींनी देवळांवरची लैंगिक शिल्प तोडण्यासाठी त्यांच्या अनुयायांना सांगितलं होतं. रवींद्रनाथ टागोरांनी हे थांबवलं. जेव्हा अॅलन डॅनिलाऊनी भारतातल्या समलिंगी शिल्पांचे फोटो जगासमोर मांडले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु त्यांच्यावर वैतागले. [14] इंद्रधनु २२ ...