पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धर्मा-धर्मात लैंगिकतेकडे बघण्याचा तुलनात्मक फरक असला तरी, सगळ्या धर्मातली स्त्रियांबद्दलची मतं, जातीव्यवस्था, लैंगिकतेबद्दलची मतं कालबाह्य झालेली आहेत. हजारोंवर्षांपूर्वीच्या मानवाची स्वत:बद्दलची समज आणि आताची समज यात खूप अंतर आहे. पूर्वीपेक्षा आज समाज जास्त अनुभवी आहे, ज्ञानी आहे. अनेक शतकांच्या प्रवासातून हळूहळू बदल होत जावून आज समाज समानतेच्या पायावर, प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांची जपणूक करण्याच्या सिध्दांतांवर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हजारो वर्षांपूर्वीचे रीती-रिवाज, नियम आजच्या जगात लागू होऊ शकत नाहीत. धर्मानी ठरवलेले नियम बाजूला ठेवून आजच्या आपल्या ज्ञानाचा, मानवाधिकारांचा आधार घेऊन समलैंगिकतेचा विचार केला पाहिजे. इंद्रधनु ... ३२