पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसाची बोलती बंद करायची. मग बाजूला घेऊन पाकीट, सेलफोन, अंगठी, चेन घेऊन त्याला सोडून द्यायचं. त्यांना माहीत असतं की हा माणूस पोलिसात जाणार नाही. (या अशा चोऱ्यामाऱ्या करणारे काही समलिंगी लोकही असतात.) काही समलिंगी पुरुष वेश्याव्यवसाय करतात. त्यातले काहीजण इमानदारीनं काम करतात. पण काही जण चोर असतात. 'कस्टमरला' अंधाऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, त्याच्या बरोबर सेक्स करताना, त्याच्या पाकिटातील पैसे, गळ्यातील चेन, सेलफोन आदि वस्तू चोरायचा धंदा करतात. अशा तक्रारी फार कमी प्रमाणात पोलिसांपर्यंत जातात. (जर एखाद्या गुंड 'कस्टमर'ला लुबाडलं तर मग त्याचे परिणामही भोगायला लागतात. कारण तो गुंड पोलिसात जात नाही. तो त्या पुरुष वेश्येला हुडकायला त्याचे साथीदार पाठवतो आणि त्याला बेदम मारतो.) काही वेळा समलिंगी पुरुषावर बलात्कार होतो. बलात्काराची कारणं अनेक असू शकतात- तो बायकी आहे; प्रतिकार करण्यास सबळ नाही; अशांना हेच हवं असतं; याला असाच धडा शिकवायला हवा; तो पोलिसात जाणार नाही ही खात्री; त्या व्यक्तीने एखाद्याला नकार दिला तर तो नकार सहन न झाल्याने, चिडून ती व्यक्ती त्या पुरुषावर बलात्कार करू शकते इ. (स्त्रियांबद्दलची पुरुषांची विचारसरणी आणि समलिंगी पुरुषांबद्दलची (विशेषत: बायकी समलिंगी पुरुषांबद्दलची) इतर पुरुषांची विचारसरणी यात फरक नाही.) बळी पडलेली समलिंगी व्यक्ती पोलिसात जायला घाबरते. तिथे गोपनीयता पाळली जाईल का! आपल्याला कोणत्या त-हेची वागणूक मिळेल! ही भीती मनात असते. बलात्कारी परवडला पण पोलिस नको, एवढी धास्ती असते. एकदा या तक्रारी पोलिसात जाणार नाहीत हे कळलं की, गुन्हेगारांचं बळ वाढतं व हे प्रकार परत परत होण्याची शक्यता वाढते. विसाव्या शतकापर्यंत अशाच त-हेचे प्रश्न ब्रिटनमध्येही दिसून येत होते. एकीकडे समाजकंटकांकडून अनेक समलिंगी लोकांचं शारीरिक व आर्थिक शोषण होत होतं तर दुसरीकडे अनेक समलिंगी लोकांना समलिंगी संभोग केला म्हणून अटक होत होती. पोलिस साध्या वेशात समलिंगी आहे असं भासवून समलिंगी लोकांना त्यांच्या जाळ्यात पकडून अटक करत होते. या जाळयात अनेक मान्यवर सापडत होते. शिक्षा अल्पशा दंडापासून ते आजन्म कारावासापर्यंत दिल्या जात होत्या. जर सुटका हवी असेल तर इच्छा नसताना लैंगिक कल बदलण्यासाठी औषधोपचार घेणं सक्तीचं होतं (ज्याने अर्थातच काही फरक पडणार नव्हता). या सगळ्या कारणांनी माध्यमांमध्ये समलैंगितेबद्दल वादळ उठलं व दोन संसद सदस्यांनी डिसेंबर १९५३ साली ब्रिटिश सरकारला विनंती केली की एक समिती स्थापन करून या कायद्यावर विचार करावा. इंद्रधनु ३६ ...