पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एच.एल.ए.हार्ट यांनी लॉर्ड डेव्हलिनच्या मताला विरोध केला. त्यांचं मत होतं की खाजगीत (राजीखुशीने) केलेल्या समलिंगी संभोगात कायद्याने दखल देवू नये, ती वैयक्तिक बाब आहे. [29] (हार्ट यांनी, डेव्हलिनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कायदा व नीतिमत्ता यांच्यावर 'लॉ, लिबर्टी अॅन्ड मोरॅलिटी' हे पुस्तक लिहिलं.) याच बरोबर कॅन्टरबरीचे आर्चबिशप म्हणाले की, प्रत्येक माणसाचं एक खाजगी आयुष्य असतं. त्याचं स्वातंत्र्य, अस्मिता जपण्यासाठी त्याच्या खाजगी आयुष्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. या अहवालाला ब्रिटिश मेडिकल असोसिशन, हॉवर्ड लीग फॉर पेनल रिफॉर्म, नॅशनल असोसिओशन ऑफ प्रॉबेशन ऑफिसर्स यांनी पाठिंबा दिला. या समितीच्या शिफारसीवर हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये १९५७ साली चर्चा झाली. १७ पैकी आठ जणांनी समलिंगी संभोग हा गुन्हा नसावा असं मत मांडलं. गृहसचिव सर डेव्हिड मॅक्सवेल-फेफ या शिफारशीवर खूप नाराज झाले व या विषयावर अजून अभ्यास व्हायला पाहिजे असं सांगून त्यांनी या शिफारसी अमलात आणण्यास नकार दिला. १९६० साली 'होमोसेक्शुअल लॉ रिफॉर्म सोसायटी' नी कायद्यात बदल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले. १९६७ साली (वुल्फेंडेन अहवाल मांडल्यानंतर १० वर्षांनी) संसद सदस्य लिओ अबसे यांनी (गृह सचिव रॉय जेन्कीन्स व पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा पाठिंबा घेऊन) 'सेक्शुअल ऑफेन्सेस' विधेयक मांडलं. याच्यावर कडवी चर्चा झाल्यानंतर कसंबसं संसदेत हे विधेयक पास झालं. [30] वुल्फेंडेन समितीचा अहवाल खूप उदारमतवादी होता असं अजिबात नाही. त्यांनी समलिंगी व भिन्नलिंगी नाती समान मानली नाहीत. त्यांनी समलिंगी संबंधांचं खंडन केलं. तरी सुद्धा, त्याकाळात समाजाच्या दबावाला बळी न पडता त्यांनी जे मत मांडलं, ते पाऊल महत्त्वाचं ठरलं. पुढे १९९४ साली समलिंगी संभोगासाठी संमतीसाठी किमान वय २१ वरून १८ वर करण्यात आलं. २००० साली ते १६ करण्यात आलं. (जे भिन्नलिंगी संभोगासाठी वय आहे.) २००० सालापासून ब्रिटनमध्ये समलिंगी जोडप्यांना कायद्याने लग्न करायची (सिव्हिल मॅरेज) मान्यता मिळाली. खाजगीतल्या लैंगिक संबंधातली नीतिमत्ता हा कायद्याचा विषय नाही हा या अहवालातल्या तत्त्वाचा ·उपयोग अमेरिका, कॅनडामध्ये लैंगिक विषयाशी निगडित कायदे बदलण्यासाठी करण्यात आला. भारतातील ३७७ कलमावर जनहित याचिका विसाव्या शतकाच्या शेवटास एचआयव्हीचा प्रसार भारतात होऊ लागला. एचआयव्ही व गुप्तरोगांच्या नियंत्रण कार्यक्रमाला ३७७ कायद्याचा अडथळा होऊ इंद्रधनु ३८ ...