पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क) काउन्सेलिंगच्या नावाखाली ब्रेनवॉशिंग करायचं.

  • तुझ्यात कुठेतरी भिन्नलैंगिकता असणार, आपण ती हुडकून काढू.
  • स्त्रिया चांगल्या असतात, त्यांची भीती वाटायचं काही कारण नाही.
  • पुरुषाचं पुरुषाशी नातं अपूर्ण असतं.
  • तुला या जीवनशैलीत काय सुख लाभणार ?
  • तुला त्यानी नादी लावलं आहे. त्याच्यापासून दूर गेलास की हळूहळू स्त्री

आवडायला लागेल.

  • तू आता याचा विचारच करू नकोस. तुझं शिक्षण होऊ दे. पुढे पाहू या.

आता हे सगळं दाबून टाक.

  • तुला लहानपणी कोणीतरी नादी लावलं असणार.

अर्थातच यातल्या कोणत्याही मार्गांना यश येत नसतं. उलट त्या व्यक्तीच्या इच्छा अमान्य ठरवून, त्याची अस्मिता पूर्णपणे ढासळते. त्या मुला/मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करण्यात, त्याचे आई-वडील, मानसोपचारतज्ज्ञ, काउन्सेलरस् कारणीभूत ठरतात. जिथे धर्म, कायदे, समाज समलिंगी असणं हा आजार आहे, विकृती आहे, पाप आहे असं समजतात समलिंगी संभोग करणं हा गुन्हा आहे असं मानतात, अशा वातावरणात वाढणाऱ्या सर्व समलिंगी व्यक्ती इगो डिस्टोनिक असणारच. मीही यातलाच एक होतो. पण एकदा का मला माझ्यासारखे लोक भेटले, आपल्यात काही वाईट नाही हे जाणवलं की मग मी इगो सिंटोनिक झालो. त्यामुळे मानसोपचातज्ज्ञांनी इगो डिस्टोनिक कॅटेगरीतल्या लोकांचा लैंगिक कल बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे धोरण म्हणजे भोंदुगिरी आहे असं माझं मत आहे. समलिंगी असलेल्या पुरुषाला 'बरं' करून त्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न लावलेल्या मानसोपचातज्ज्ञाचं उदाहरण माझ्या माहितीत नाही. संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञ काही तुरळक मानसोपचारतज्ज्ञ उदारमतवादी दृष्टिकोन बाळगतात. ते समलिंगी व्यक्तींना स्पष्ट सांगतात की, " हा आजार नाही. समाज समलैंगिकतेला आजार मानतो आणि ह्या समाजाकडे बघून तुला तुझं प्रतिबिंब आजारी म्हणून दिसतं. तू आजारी नाहीस त्यामुळे तुला बरं करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी डाव्या हातानं लिहितं, कुणी उजव्या हातानी लिहितं, कुणी दोन्ही हातांनी लिहू शकतं, तसंच आहे हे. यात हे चांगलं किंवा ते वाईट असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ९५% लोकांना संत्री आवडतात व ५% इंद्रधनु ६४ ...