पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोकांना सफरचंद आवडतात. म्हणजे ५% लोकांची आवड कमी दर्जाची आहे असं अजिबात नाही. ती वेगळी आहे एवढंच. हे मानसोपचारतज्ज्ञ, पालकांनी मुला/मुलीला आहे तसं स्वीकारावं यासाठी पालकांना काउन्सेलिंग द्यायला तयार असतात. जर पालक म्हणाले की, “नाही, आम्हाला हे मान्य नाही. काहीही करा पण त्याला/तिला ठीक करा” तर हे मानसोपचारतज्ज्ञ सरळ पालकांना बाहेरचा रस्ता दाखवितात. डॉ. भूषण शुक्ल म्हणाले, “मी स्वत: 'person centred approach' वापरतो. मी त्यांना 'इगो सिंटोनिक व इगो डिस्टोनिक' समलैंगिकता म्हणजे काय हे सांगतो. जर क्लायंटला समलैंगिकतेचा त्रास होत असेल तर त्या त्रासाची कारणं शोधतो. ही कारणं कशी दूर करता येतील याचा प्रयत्न करतो. त्या मुलाला त्याच्या गरजांची जाणीव करून देतो. स्वत:ला बदलण्यापेक्षा (जे शक्य नाही) त्यांनी जसं आहे तसं स्वतःला स्वीकारावं ही माझी भूमिका असते. This usually works for the client पण काही पालक हट्ट धरतात की त्याला 'बरा' करा. पण असे पालक फार काळ टिकत नाहीत कारण त्यांना लगेच कळतं की मी त्यांचा मुलगा 'बरा' होण्यासाठी काहीही औषधोपचार करणार नाही.... खूप सायकिअॅट्रिस्ट समलिंगीद्वेष्टे आहेत. वैद्यकीय शिक्षणात या विषयावर संवेदनशीलता शिकवण्यात येत नाही. त्यामुळे या विषयावरचा संवेदनशील दृष्टिकोन (निर्माण करणं) हा स्वतःच्या मानसिक वाढीचाच एक भाग आहे.” [56] डॉ. संज्योत देशपांडे म्हणतात, "याबाबतीत शास्त्रीय दृष्टिकोन असं सांगतो की, होमोसेक्शुअल व्यक्ती त्या पद्धतीनेच जन्माला आली आहे. आपल्याला माणसाच्या रंग-रूपाचे असे प्रश्न पडतात का? ती व्यक्ती तशीच आहे हे आपण जितक्या सहजतेने म्हणतो तितकी सहजता याही बाबतीत यायला हवी असं मनोविकारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. इटस् अ वे ऑफ वनस् लाइफ!" इंद्रधनु... ६५