पान:इतिहास-विहार.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
केळकरांचे लेख

जवळच उभे असलेल्या छत्रपतींच्या शिपायांनी त्यांजवर अनेक वार करून 'त्यांचा प्राण घेतला. या गोष्टीस अनुलक्षून एक गृहस्थ एका पत्रांत लिहितात, "छत्रपति म्हणवितात, पण कम अंत्यजाचीं करितात." पण पुढे एके- प्रसग पटवर्धनांनाहि हेंच कर्म केलें ! विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं, कैद होऊन आलेल्या जखमी प्रतिपक्षी योद्धयास बहुमानपूर्वक उपचार `करून जगवावें तें न करितां, बेशुद्ध स्थितींत त्यास घोड्यावरून ढकलून - पाडून मारविणाऱ्या छत्रपतींनीं त्यांच्या तेराव्या दिवशी भाऊंच्या चिरें- जीवाला दुखवट्याचा आहेर पाठविण्यास कमी केलें नाहीं ! बहुधा याच 'देवारी दाखल्याच्या आधारावर हल्लींचे करवीरकर छत्रपति यांनी, लो० . टिळकांना जन्मभर अनेक प्रकारें छळूनहि त्यांच्या मरणानंतर तेराव्याच्या "प्रसंगी टिळकांच्या चिरंजीवांना दुखवट्याचा आहेर पाठविला असावा. या दुसन्या आहेराची गोष्ट अवघ्या पावणेदोन वर्षांपूर्वी घडली असल्यामुळे लोकांच्या लक्षांत ताजी आहे; व ज्यांना ती आठवत असेल त्यांना खरे- शास्त्री यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहांतील एतद्विषयक भाग वाचून इति- 'हास हा स्वतःची पुनरावृत्ति करीत असतो ही म्हण पटल्यावांचून राहणार नाही. इतिहासाने जुनेनव बेमालूम रीतीने सांधले जातें व कालाच्या मोघा- बरोबर मानवी भावनांचा ओघहि अखंड वाहत असल्याचें प्रत्ययास येतें छाच इतिहासाचा खरा उपयोग; व तो खरेशास्त्र्यांच्या प्रस्तुतसारख्या ग्रंथांनी चांगला साधतो:'