पान:इतिहास-विहार.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचे ऐतिहासिक पोवाडे

आपली आपण करी स्थति, तो एक मूर्ख" असें एक मूर्खलक्षण राम- दासांनी लिहून ठेविलें आहे. पण हैं लक्षण 'स्वतः' ची स्तुति करणा- या व्यक्तीला लागतें; स्वतःच्या 'राष्ट्रा'ची किंवा 'समाजा' ची स्तुति करणा- या व्यक्तीला लागत नाहीं. फार काय, पण खुद्द रामदासांच्या पुढे हा प्रश्न असता तर त्यांनीं असेंहि लिहून ठेवलें असतें कीं, 'आपुल्या राष्ट्राची न करी स्तुति तो शतमूर्ख. " स्वतःच्या स्तुतीबरोबर 'वडिलांची कीर्ति' सांगणे ही एक निषिद्ध गोष्ट म्हणून रामदासांनी सांगितली आहे खरी; पण तिचा अर्थ मात्र उघड दिसतो तसा नव्हे. वडिलांची स्तुति करणें- किंवा कीर्ति गाणे यांतहि दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हटला म्हणजे नादान बढाईखोरपणाचा ज्यांत निव्वळ वडिलांच्या कीर्तीच्या भांडवला- वरच सर्व व्यापार भागविण्याचा प्रसंग असतो. असला मनुष्य वेळी. अवेळी वाडवडिलांच्या नांवाशिवाय बोलावयाचाच नाहीं, त्याला कांहींहि विचारा किंवा तो तुम्हांस कांहींहि सांगो, त्यांत त्याच्या बापदादांची.. साक्ष किंवा जामीनकी असावयाचीच. त्यांच्या आयत्या पिठावर याच्या रेवा; त्यांच्या कर्तबगारीवर हा आपल्या मिशीला पीळ भरणार! आणि निवळ खानदानी - कीर्तिमान् पूर्वजांच्या पोटी जन्मास येणें - हीच काय ती. याची अवघी लायकी, हेंच याचें सारें शील, समर्थांच्या उक्तीचा कटाक्ष : असल्या बढाईखोर स्तुतिपाठकांवरच आहे. पण मूर्खपणा पदरी बांधून न घेतांहि 'वडिलांची कीर्ति' गातां येणे शक्य असतें. या दुसऱ्या प्रकारच्या स्तुतिपाठकांना आपल्या पूर्वजांच्या लायकीचा अभिमान असतो;पण त्याजबरोबर त्यांना स्वतःच्या नालायकीची जाणीव असून, तशी लायकी 1. परमेश्वरा ! आपल्याहि अंग येईल काय ? अशी आर्त व कळकळीची:: प्रार्थना त्यांच्या अंतःकरणांतून निघत असते. प्रत्येक मूर्तिपूजकाला आपली देवाची मूर्ति उज्ज्वल असावी अशी इच्छा असते; व यामुळे तो ती मूर्ति aat aatar मौल्यवान् पदार्थोंनीं शृंगारतो.पण "माझ्या देवाच्या.


  • तारीख ९ माहे एमिल सन १९१२.