पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कीं, प्रत्यक्ष लढाईत न मिळालेली अशी शत्रूंची मालमत्ता राज्याच्या मालकीची समजावी. ह्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची तें राज्याचा प्रमुख ठरवील.
 अशा रीतीनें मदिनेंतून बहुतेक बंडखोर ज्यू गेले. परंतु थोडे ज्यू मागे राहिले होते. ते सूडाच्या इच्छेनें राहिले होते. आम्ही पूर्वीचा जुना करार पाळू." असें ते मुहंमदांस म्हणाले. म्हणून विषाचा पुनः पुन्हां कटु अनुभव आला तरीहि त्यांनी त्यांना राहूं दिले. परंतु आपल्या वळणावर ते गेले. त्यांची कुरेशांजवळ कारस्थानें सुरू झालीं. मक्कावाले स्वस्थ नव्हतेच. सर्व अरबस्थानांतील मूर्तिपूजक जातिजमाती मुहंमदांविरुद्ध उठविण्याची त्यांची खटपट चालली होती. कुरेशांचा व इतरांचा एक प्रबळ संघ स्थापला गेला. आणि दहा हजारांचं सैन्य मदिनेवर निघालें! अबु सुफियानच सेनापति होता. मदिनेपासून थोड्या अंतरावर हें प्रचंड सैन्य तळ देऊन तयारीने राहिलें. मदिनेंत तीन हजारांचेच सैन्य उभ राहूं शकले. शहरांतील असंतुष्ट मुनाफिकीनांच्या दगाबाजीची भीति होतीच. मदिनेभोंवतीं खंदक होता. तो आणखी खोल करण्यांत आला. ज्या बाजूस संरक्षण नव्हते त्या बाजूचा खंदक अधिकच खोल खणला गेला. तटबंदीच्या ठिकाणी बायकामुले ठेवण्यांत आली. मदिनेतील सैन्य बाहेर पडलें. शहराच्या बाहेर त्यांनी छावणी दिली. समोर खंदक होता. ज्यूंची बनी कुरेझा ही एक जमात मदिनेच्या नैऋत्येस रहात असे. ते तटस्थ राहतील, असा भरंवसा होता. ते कराराने मदत करण्यास बांधलेले होते. करार मोडा व मूर्तिपूजकांस मिळा, असा त्यांना कुरेशांचा निरोप आला. मुहंमदांस ही दगलबाजी कळली. त्यांनी बनी- नुझैरांकडे दोन जबाबदार लोकांबरोबर निरोप पाठविला की, "तुम्ही कर्तव्यास जागा." परंतु ज्यूंनीं उर्मट उत्तर दिले, "हा मुहंमद कोण? ज्याची आम्ही आज्ञा पाळावी असा हा कोण मुहंमद पैगंबर? त्याचा व आमचा कोणताहि करार झालेला नाहीं." ज्यूंना महिना शहराची सारी बातमी होती. ते ती शत्रूला पुरवतील, अशी भीति वाटत होती. शहरांतील मुनाफिकीनहि गडबड करूं लागले. मुसलमानांत संताप, प्रक्षोभ व अशांति वाढत होती. परंतु मुहंमद त्यांना शांत ठेवीत होते. कुराणांतील तेहतीसाव्या सुऱ्यांत या वेळच्या परिस्थितीचं फारच सुंदर वर्णन आहे. मुस्लीम सेना पुढे मैदानांत आली कीं, अचानक जाऊन मदिनेवर हल्ला करावा, असें बनी कुरेझा मनांत म्हणत होता. आंतहि असंतुष्ट लोक होतेच. परंतु मुहंमद खंदक ओलांडून पुढे जातना. मदिनेच्या भिंतीस पाठ
११० ।