पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य दर्शनाऐवजी पापाचेच दर्शन घडले. साधूच्याऐवजी ढोंगी लोकांचीं दुष्कर्मेच पाहण्याचे नशिबी आले आणि त्यामुळे ते आध्यात्मिक मार्गापासून परावृत्त झाले. या वेळी त्यांना भेटलेल्या साधूपका कोणी सांगितले की, हिंदुस्थानांतील सर्व लोकांना साक्षात्कार झाल्याशिवाय * हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची चळवळ यशाच्या मार्गावर जाणारच नाहीं." ही अशक्य गोष्ट जगाच्या अंतापर्यंतही घडणार नाहीं, हें रॉय यांचे तीव्र बुद्धीला तेव्हांच कळले. या साधूच्या सांगण्यामुळे त्यांची थोडा वेळ लुप्त झालेली बुद्धिवादी मनःप्रवृत्ति तीव्रतेने जागी झाली. तिच्या प्रखरतेमुळेच अध्यात्म प्रवृत्तीचा खोटा अंकुर अग्निसात् झाला. हे सुदैव की दुर्दैव ? व कोणाचे ? एवढे खरे की, त्यांनीं रूढ अर्थाने आध्यात्मिक उन्नतीची वाट सोडली.. परंतु, अखिल दलित जनतेस आध्यात्मिक विकासास वाव मिळावा म्हणून त्यांचा उद्धार करण्याचे कार्यास ते मिळाले हे त्या दलितांचे सुदैवच नव्हे का ? आणि त्यांच्या स्वतःच्या दृष्टीनेही ही काय कमी आध्यात्मिक उन्नति झाली ? याही बाबतींत भाई रॉय व राष्ट्रपति सुभाषचंद्र यांचे साम्य आहे, हा योगायोग विशेषच वाटतो. सुभाषचंद्र बोसही अशा त-हेने देवशोधार्थ गेले होते, पण तेही विन्मुख होऊन परत आले. १९१४ सालीं महायुद्ध सुरू होतांच निव्वळ दहशतवादी स्वरूपाची असलेली चळवळ अधिक उग्र स्वरूप दाखवू लागली. इंग्लंडवर आलेल्या आषत्तींची सुसंधि साधून हिंदुस्थानच्या चळवळीच्या गाडीला लाईन ‘क्लिअर' घेतली तर आपले स्टेशन आपणांस लवकर गठित येईल याची स्थूल कल्पना त्या काळांतही हिंदुस्थानांतील बहुत जहाल-वर्गीय लोकांत होतीच. आतां ही संधि आली आहे असे अळि खन बंगालमधील क्रांतिकारक गटाने ती साधावयाची असे ठराव दहशतवादाचे रूपांतर बंडांत करावयाचे व बंड यशस्वी करून राज्य