पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐतिहासिक व सामाजिक पाश्र्वभूमि लेल्या मार्गानेच त्याच्या पूर्वजांनी केली आहे. शिवाय लूटमारीने लढाऊ मनोवृत्ति बळावते हाही फायदाच नव्हे का ? कारण मनुष्याच्या रानटी अवस्थेत ह्याच गुणाचे महत्त्व असते. नैसर्गिक कारणांनीं दरोडेखोरी करावी लागल्यामुळेच अरबांमध्ये व्यापार व युद्ध या प्रवृत्तीचा चांगलाच विकास झाला. महंमदापूर्वी १७०० लढाया अरबांनी जिंकल्याचा उल्लेख 'अयाम–अल्-अरब' या पुस्तकांत आहे. हे पुस्तक अरब साम्राज्याच्या ऐन भरभराटीच्या काळात लिहिलेले आहे. अर्थात् लढाऊ गुणाचा वारसा इस्लामी धर्मापासून त्यांना मिळाला हे खरे नव्हे ! आपली ‘तरवार ‘देवकार्यासाठी ' उपयोग करण्यापूर्वीच ते मोठे योद्धे होते. लष्करी महत्कृत्याचे श्रेय देशाच्या, अर्थात् साम्राज्याच्या, परिस्थितीलाच आहे, धार्मिक शिकवणीस नव्हे. यादीचे लाभालाभ महंमदापूर्वीची युद्धे हीं यादवीच्या स्वरूपाचीं युद्धे असत. त्यांचे स्वरूपही भयंकर असे. परंतु ती सर्व युद्धाच्या नीतिनियमांनी चालत. युद्धांतील रक्तसिंचनामुळे अरबस्थान कांहीं सुपीक झाला नाहीं. परंतु त्याचा उपयोग अरबांना आर्थिक दृष्ट्या लाभकारी अशा व्यापारधंद्यास प्रवृत्त करण्याचे काम मात्र झाला. आर्थिक दृष्ट्या आवश्यक झाल्यामुळे युद्धाची घातुक प्रवृत्ति सोडून अधिक लाभकारी मार्गाकडे वळणे अरबांना भाग पडले. या आवश्यकतेंतून साहजिकच उदय पावलेली कल्पना म्हणजे * महंमदाचा धर्म होय. | या ओसाड व उजाड मैदानाच्या तिन्ही बाजूस सुफल आणि बहुजनयुक्त असे तीन प्रदेश आहेत. हे तीन प्रदेश तीन प्राचीन संस्कृतींचीं केंद्रे होत; आणि या तिन्हीही प्रदेशांत अनंत कालापासून व्यापार व शेती यांची भरभराटच होत आली होती. विशेष हें कीं ५३