पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐतिहासिक व सामाजिक पाश्र्वभूमि कोरेश टोळीचे माहात्म्य परंतु इतर टोळ्यांना कोरेश टोळ्यांचे स्वातंत्र्य व समृद्धि यांचा हेवा वाटू लागला. त्या असा अभिमान वाहू लागल्या की, आपण जुन्या नीतीचे व कायद्याचे संरक्षक. त्यांच्यामध्ये देवतांच्या संरक्षणाच्या निमित्ताने युद्धास व अंतःकलहास सुरुवात झाली. पूर्वीच लुटालूट व यादवी, शत्रूशीं-तिहाइतांशी झगडण्यांत वेळ वेचत असे त्या वेळी ठीक होती, परंतु तीमुळे आतां राष्ट्रीय व्यापाराचे पाय तोडल्यासारखे होऊ लागले होते. ज्याच्या हातीं आर्थिक सत्ता होती त्यांचे-कोरेश टोळीचेराष्ट्रीय व राजकीय विकासासाठी सर्व झगडा थांबवून ऐक्य घडवून आणणे क्रमप्राप्त असे कर्तव्यच झालें. कोरेश या टोळीला अर्थातच ऐतिहासिक माहात्म्य प्राप्त झाले. अखंड यादवी चालू असतांही सर्व अरबांच्या टोळ्या मक्केजवळील काबाच्या देवळांतच आपलें भजनपूजन करीत असत. राष्ट्रीय धर्मपीठाचा ताबा कोरेश टोळीच्या हातीं होता. धर्मपीठाच्या अधिकारी वर्गाचे काम ‘हशेम' कुटुंबाकडे होते. देशांतील जनता या कुटुंबाकडे आदराने आणि मानाने पाहात असे आणि व्यापारामुळे समृद्धि तर मिळाली होतीच. म्हणून अनेक देवांचे अस्तित्व झिडकारून एक देव मानण्याची ऐक्याची उद्घोषणा करणारे फतवे वरील कुटुंबियांनी काढले. अद्वैत तत्त्वाचे स्घागत अंतःकलहानें विस्कळित झालेल्या जनतेची अंतरींची भूक महंमदाच्या कडव्या अद्वैताने तर भागविलीच, परंतु शेजारच्या राष्ट्रांतूनही–जेथे सनातनीयांचा छळ असह्य झाला होता—या ऐक्याच्या हाकेस ‘ओ' मिळाली. मॅगींचा गूढवाद, ज्यूंचा पुराणाभिमान आणि ख्रिश्चनांचा दुरभिमान यामुळे इराण, मेसँपोटेमिया, सीरिया, इजिप्त, पॅलेस्टाईन येथील लोकांचे धार्मिक जीवन अगदीं गुंतागुंतीचे होऊन ५५