पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/182

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वें


इस्लाम आणि तत्त्वज्ञान



 " मुस्लिमांनी जसे रोमन साम्राज्याचे प्रांत जिंकले, तसे तत्त्वशान व शास्त्र हे प्रांतही त्यांनी पादाक्रांत केले"

-डॉ. ड्रेपर


मुस्लिमांनी तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे यांचा एकनिष्ठपणे परामर्ष घेतला आहे. ग्रीक विद्या व तत्त्वज्ञान यांचा वारसा मुस्लिमांना प्राप्त झाला होता. त्याच्या आधारे पण खतंत्ररीत्या त्यांनी आपलें तत्त्वज्ञान जगापडे मांडले आहे. इस्लामी तत्त्वज्ञान म्हणजे इस्लामी तत्त्वांचा प्रभाव असलेला पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारांचा परिपाक होय. ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे धार्मिक हटवांदांविरुद्ध बंड तर इस्लामी तत्त्वज्ञान म्हणजे धर्म व तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ असें आपणांस म्हणता येईल. मुस्लिम तत्त्वज्ञांनी जगाच्या तत्त्वज्ञानांत फार मोलाची भर घातली आहे असें विचारांती आपणांस कबूल करावे लागेल. अल-गझ्झालीचा चिकित्सावाद आणि इब्न रुश्द यांची स्वतंत्र प्रज्ञता यांमुळे जागतिक तत्त्वज्ञान अधिक समद्ध झाले आहे. लँग म्हणतो, " अरब संस्कृतीच्या विकासाबरोबर नव्या स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा विकास करणारा इस्लाम धर्म सर्वांत अगदी तरुण धर्म होय."*


History of the Conflict between Religion & Science, P. 106. *


भौतिकवादाचा बिकास, भाग १ ला, पृ. १७७.


१५७