पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि धर्मशास्त्र

७५



करणारच नाही. परंतु जुना धर्म अवनत झाला होता, सुसंस्कृत जनतेची आध्यात्मिक भूक भागविण्यास तो असमर्थ होता.. दुष्ट तत्त्वाच्या जाचांतून सोडवणूक व्हावी व होईल म्हणूनच महंमदाचे अद्वैताचे साधे तत्त्व त्यांनी स्वीकारले....आफिकेच्या उत्तर प्रदेशांत या सर्वभक्षक क्रांतीचे खरे कारण नवधर्माने ( इस्लामनें ) केलेली सक्ती नसून जुन्या धर्माची अवनती व त्यामुळे उत्पन्न झालेली अगतिकता व निराशा हेच होय, सिप्रिअन, अथेन्सिअस व अगष्टाईन यांच्या शक्तियुक्तीने स्थापिलेला जीजसचा धर्म एरिअन डोनॅटिस्टांच्या दुष्ट चालींनी व कॅथोलिक पंथीयांनी विपरीत केला म्हणूनच दरिद्री जनतेने त्याचे विरुद्ध बंडाचे निशाण उभारले."

 हिंदुस्थानच्या परिस्थितीचे विश्लेषण करतांना रॉय लिहितात, " बुद्धाच्या पराभवानंतर, देशाची स्थिति अधिकच वाईट झाली. आर्थिक दुरवस्था, राजकीय जलूम, बौद्धिक बेबंदशाही ( Intellectual Anarchy ) व आध्यात्मिक गोंधळ यांनी सारा देश बुजबुजाटून गेला होता. सर्व समाज विनाश व विघटना यांच्या चक्रांत सांपडला होता आणि म्हणूनच दलित जनता, सामाजिक समता व राजकीय स्वातंत्र्य यांचे आश्वासन देणाऱ्या इस्लामी धर्माच्या झेंड्याखाली गोळा झाली."* हिंदु संस्कृतीचा निष्ठावंत भक्त हॅवेल याने आपल्या ' हिंदुस्थानांतील आर्यांचे राज्य' या ग्रंथांत या विषयावर आणखी थोडा उजेड पाडला आहे. तो म्हणतो, " हर्षवर्धन राजा सातव्या शतकाच्या मध्यास निवर्तला. इस्लामचा विकास व हिंदी राजकीय अवनती ही एकसमयावच्छेदेने


+ Historical Roll of Islam, Page 47-48.


* Historical Roll of Islam, P.97.