पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/64

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अँक ३ به با कृत्पांकडे त्याचे चित्त गुंतलेलें होतें. ह्यासमर्पतर चित्तास व्यग्रता काहींच नाई. एक शेोकमात्र ज्याच्यचित्तास सीबती, अशा रामभद्राचा पंचवर्टीत प्रवेश झटला ह्मणजे मेोठाच अनर्थ होणार. ह्यासाठी तिनें सीतादेवी इकडे आणली हैं बरें केले. पण आतां सीतादेवीकडून रामभद्राचे आश्वासन ती कोणत्या प्रकारें करवील कोण जणि, तमसा-आज भागीरथैर्नेि सीता देवीला असे सांगितले आहे की,अगे वत्से जानकी,आज तुझे पुत्रकुश लवह्यांचा बारावे वर्षाचा वाढवीस आहे, यासाठी आयुष्य वृन्ध्यर्थ मंगल विधि केला पाहिजे. ह्याजकरितां आपल्या हातांनी पुष्पैं आणून आपला आयश्वशुर आणि मनुवंशाचा उत्पादक जो निष्कलंक देव 'सविता त्याची पूजा कर. भिऊंनकी. तूं भूमिभागावर हिंडत फिरत असतां तुला आमच्या प्रभावार्ने वनदेवता ही पाहूंशकणार नाहीत. मग मनुष्य कोठून ? असें तिला सांगून मलाही आज्ञा केली आहे, की है तमसे, जानकीचा प्रेमा तुजवर फार आहे, याकरितां तूंच हिच्या बरोबर राहून हिचे रक्षण कर. तर आतां मला भागीरथीच्या आज्ञेप्रमाणे केले पाहिजे. मुरला-तर मग आतां मला गोदावरी कडे जाण्याची गरज नाहीं मी हा वृत्तांत लोपामुद्देला जाऊन सांगतें. रामभद्र ही तेथे आला असेल असे वाटतें. तमसा-ती जानकी पहा गोदावरीच्या डोहा पासून निघून इकडे येत आहे. 轉 सूर्य,