पान:उर्जा व पर्यावरण.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) आवश्यक त्या मापाचे वायरचे तुकडे कापून घेऊन मंडलाकृतीनुसार केसिंग पट्टीतून फिरवा. (४) आवश्यकतेनुसार स्क्वेअर बोर्ड लेआऊटनुसार लाकडी फळीवर बसवा. (५) मंडलाकृतीनुसार एस.पी.स्विच, बॅटन होल्डर्स व टूवे स्विच यांची जोडणी करून स्क्वेअर बोर्डवर बसवा. (६) मंडलाला पुरवठा द्या व गोदाम वायरिंगची कार्यपद्धती अभ्यासा. दक्षता व काळजी : (१) केसिंग कॅपिंग पट्टी कापण्यापूर्वी पेन्सिल व ट्रायस्क्वेअरने आखणी करा. (२) केसिंग पट्टी कापताना टेनन सॉ सरळ स्थितीत ठेवून कापघ्यावा. (३) वायरिंग केसिंग पट्टीतून फिरवताना त्याला पीळ पडू देऊ नये. दिवस : दुसरा प्रात्यक्षिक : फ्यूज वायरची निश्चिती करणे. प्रस्तावना : उपकरणामधून वाहणारा वीजेचा प्रवाह अचानक जास्त झाला तर उपकरणात बिघाड होऊ शकतो. शार्ट सर्कीटमुळे वा वीज कंपनीकडून येणाऱ्या वीज पुरवठ्यातील गडबडीमुळे वीजेचा प्रवाह मर्यादेपेक्षा वाढू शकतो. असा वीज प्रवाह वाढल्यास, उपकरणांमधून वीज वाहू नये म्हणून फ्यूज वापरतात. फ्यूजच्या साहाय्याने विद्युत प्रवाह खंडीत होतो. सर्कीटमधून वाहणाऱ्या कमाल वीज प्रवाहा (उपकरणाचा रेटेड करंट) पेक्षा अधिक करंट, फ्यूजच्या तारेतून वाहीला तर फ्यूजची तार वितळते. त्यामुळे योग्य फ्यूजची निवड करणे आवश्यक आहे. सर्कीटमध्ये सर्वसाधारण स्थितीमध्ये लोडमुळे सर्कीटमधून जेवढा करंट वाहतो, तेवढाच करंट फ्यूज वायरमधूनही वाहत असतो. त्यामुळे फ्यूज वायरमध्ये अल्पशी उष्णता निर्माण होत असते. मात्र या उष्णतेमुळे फ्यूज वायर वितळत नाही. सर्कीटवर ज्याप्रमाणे लोड वाढेल त्याप्रमाणे सर्कीटमधून वाहणाऱ्या करंटमध्ये वाढ होते. एका विशिष्ट पातळी (rating) च्या वर विद्युत प्रवाह वाहिल्यास निर्माण होणाऱ्या उष्णतेने फ्यूज वितळतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने फ्यूज वितळतो. प्रात्यक्षिकास खालील साहित्य व साधनांची आवश्यकता आहे. तत्त्व : एखाद्या कंडक्टरमधून त्याच्या मर्यादपेक्षा जास्त करंट वाहत असताना त्यामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होऊन तो वितळतो/या तत्त्वावर फ्यूज कार्य करतो... साहित्य : अमीटर, स्क्रू ड्रायव्हर, वायर कटर, टेस्टर, पक्कड इ. साधने : फ्यूज वायर, फ्लेक्झिबल वायर, स्विच, रेग्युलेटर इ. पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिक करण्यासाठी वेगवेगळ्या गेजच्या फ्यूज वायर आणून ठेवा. (२) जोडणीकरिता इस्त्री, हिटर व शेगडी या प्रकारची उपकरणे आणून ठेवा. (३) प्रात्यक्षिकापूर्वी ही उपकरणे दुरुस्त असल्याची खात्री करून घ्या. (४) प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे गटामध्ये विभाजन करून घ्या. (५) फ्यूज वायरचे तीन ते चार सेट तयार करून तयार ठेवावे. (६) बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या फ्यूजची माहिती गोळा करून ठेवा. (७) शाळेत मीटर आहे का याची खात्री केल्यावर फ्यूजमधील तारेची उपलब्धता तपासा. (८) प्रात्यक्षिकासाठी विद्युत पुरवठयाची उपलब्धता तपासून पहा अन्यथा त्यावेळेत थेअरी भाग शिकवा व नंतर गटानुसार प्रात्यक्षिक शिकवा. ३७