या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तृष्णा


घडला गुन्हाच उशिरा कळला
 जीव हा पोळला | सहजची ॥
तुझ्या-माझ्याजगी दिवस आंधळा
 रातीचीच शाळा । ज्ञान देई ॥
किती दिवसांनी भेटशील देवा
 वाटेल बा हेवा । निष्ठुराला |
आकाशाची गंगा धावे भूमीवरी
 पाप ते सत्त्वरी । सुचिर्भूत ॥
तुझे आगमन माझ्या खोपटात
 मी तुझ्या पटात । विणलेली ॥
अमृताची तृष्णा मला न लागते
 दर्शनी भागते । भक्ती माझी ॥
तुझा माझा खेळ पाठ शिवणीचा

 उगा जिवणीचा शीण होई ॥

उष:काल । २४