या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभयाचा ठेला

दिवसा ढवळ्या
स्वप्नात पाहते
दुथडी वाहते - तुझ्यात मी ॥


अवचित होती
लागे स्वप्न एक
प्राणाचीही भीक - काही नव्हे ॥

निर्गुण - नाकार
तुझीच जाणीव
तेवढी उणीव - नाही मज ॥

तूच माझ्या जीवा
होऊनिया शेला
अभयाचा ठेला- सापडशी ॥

नाही भय मज
कुण्या दुर्जनाचे
चित्तावरी नाचे - मूर्ती तुझी ॥

नाही तुझा जाच
नाही तुझा बंद

ना तरी बेबंद - तुझ्यासवे ॥

उषःकाल । ३१