पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/8

हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणे' हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी दुष्काळ संपणार. तो निवारणाच्या सरकारी कार्यक्रमाने कधीच संपणार नाही. हेही अनेक लेखांतून, जगभराच्या उदाहरणातून स्पष्ट केलं आहे. मला ‘जग आणि आपण' अशी नेहमी तुलना अशासाठी अनिवार्य वाटते की इथल्या मातीत असं सकस, अस्सल, पारदर्शी फार कमी आढळतं. म्हणून मी राष्ट्रभक्त असलो, तरी आंधळेपण मला मान्य नाही. ‘जगी जे उज्ज्वल, ते अनुसरावे उत्तम' या मताचा मी असल्याने मला ‘देशाटनातलं लोकशिक्षण' नेहमीच महत्त्वाचं वाटत आलं आहे.
 वर्तमानकाळात सर्वाधिक महत्त्वाचं विकास साधन म्हणजे शिक्षण! एकीकडे तंत्रज्ञानाचा अंगीकार, दुसरीकडे गुणवत्तेस प्राधान्य व तिसरीकडे सर्वांना शिक्षण अशी त्रिसूत्री घेऊन काम केल्याशिवाय आपण वर्तमान समाज बदलू शकणार नाही. पदवी हे पैसे मिळवायचं साधन नाही. ते जीवन साध्य आहे. ज्ञान हे कौशल्य आहे, पाठांतर नाही. नोकरीपेक्षा उद्यम, व्यापार, व्यवसाय हाच विकासाचा खुश्कीचा मार्ग आहे, पण तो सचोटीने करायला हवा. अशा अनेक गोष्टी शिक्षणविषयक काही लेखातून आल्या आहेत. स्त्री शिक्षणाचा ढाचा पुरुष शिक्षणापेक्षा वेगळा करणं, स्त्री व नोकरी यांचा नवा ताळमेळ बसवणं (विशेष सवलती, सुविधा देऊन), शिवाय हक्क सुरक्षित ठेवणं या सर्वातून ‘समतेची नवसंकल्पना उदयास येणार आहे याचे भान आपल्या राजकत्र्यांना व नियोजकांना दिसत नाही. धोरणातील लवचीकता, दीर्घ पल्ल्याचे नियोजन, लोकसंख्या नियमन, बेरोजगारी संपवण्याचा धडक कार्यक्रम, अर्थपुरवठा व वसुलीची कठोरता यातूनच बांधील समाज जीवन उदयास येईल, हे सांगणारे सदर लेख वर्तमान शतकाचे प्रश्नच मांडत नाहीत, तर जगाची उदाहरणे अधोरेखित करत आपणाला बदलास भाग पाडतात, अशी माझी धारणा आहे. हे लेखन त्याच ध्यासातून केले गेले आहे. एकविसावे शतक नव-नव्या संकल्पनांचे जसे आहे, तसे ते नव-नव्या प्रश्नांचेही आहे, याचे भान या पुस्तकातून झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी उद्याचं जग नवरचनेचं करण्याचा संकल्प सोडला असेल त्यांना हे पुस्तक ते आकारण्याचा मार्ग दाखवील. पूर्वपुण्याई, पूर्वविचार, पूर्वेतिहास यावर जगण्याचे दिवस संपले. 'अपना हाथ जगन्नाथ' मानून जे एकनाथ पुरुषार्थी बनतील उद्याचे जग त्यांचेच असेल, हे समजावणारे सदर पुस्तक आपण सर्वांनी मुळातूनच वाचावे.
 ‘एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न' मी वेळोवेळी मांडले, लिहिले. पण ते एकत्रित स्वरूपात माझे आत्मीय सुहृद सतीश पाध्ये यांच्यामुळे