पान:एक नवें तुफ़ान.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १७ ] जो वादळाचें धोरण बांधतो, ते येण्याच्या अगोदर जो आपले सुकाणूं धड्ड • घरितो, व पूर्वतयारी असल्यामुळे वादळांतून शौर्यानें निभावतो तो खरा नावाडी. सूर्य उगवल्यावर तो सर्वोसच दिसतो तो दाखविण्यास पुढारी लागत नाहीं. पण पहाट फुटण्याच्या पूर्वी सूर्योदयाची घटका निश्चित करण्यास बुद्धीचा धड धोरणाचा खोल पुढारी पाहिजे असतो. या दृष्टीनें पाहिल्यास मिसेस बेझंट यांची विशाल बुद्धि आपल्या बेंर्धेत गुंतागुंतीचे मोठमोठे प्रश्न धरूं शकते हैं सिद्ध करणे कठीण नाहीं. १९९७ च्या डिसें- •बरमध्ये युरोपीय महायुद्धाचें काय होणार याचा कोणासही थांग नव्हता. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपीठावरून बाई म्हणाल्या, " राजकारणी माणूस या नात्यानें नव्हे तर अध्यात्मशास्त्रज्ञ या नात्यानें मी सांगतें कीं, मला या लढाईच्या निकालाविषयीं शंका वाटत नाहीं. एकतंत्री सत्तेप्या नाश व्हावा यासाठी ही लढाई आहे. राज्यकारभारांत तसेंच लढाईतही एकमुखी सत्ता लोकसत्तेइतकी कार्यक्षम नाहीं हें ठरून एकमुखी सत्तेवरील जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय लढाई संपणार नाहीं. एकमुखी सत्तेर्ने तात्पुरता फायदा व यश लढाईत प्रारंभी मिळते पण तें खरें नव्हे, या लढाईत ही सत्ता नाश पावणार आहे. " त्यावेळी जर्मनींतील लोक कैसरला कंटाळून आपणच पदच्युत करतील व त्यानंतर लगेच हें युद्ध संपेल अशी कल्पना कोणाच्याही ध्यानीं नव्हती, हे लक्षांत ठेवून वरील शब्द वाचल्यास जगाचे प्रचंड प्रश्न उलगडण्यांत बाईची बुद्धि किती कुशाग्र आहे याचा वाचकांस अजमास करतां येईल. काँग्रेसमध्ये अशा प्रकारचे विधान बाईंनीं १९१७ च्या डिसेंबरांत केलें. पण थिऑसफिकल वाङ्मयांत हेच विचार १९१४ च्या आक्टोबरांत म्हणजे लढाई सुरू होऊन दोनतीन महिन्यांतच त्यांनी प्रकट केले होते हैं लक्षांत ठेविल्यास वाचकांस अधिकच आश्चर्य वाटेल. महात्मा गांधी व मिसेस बेझंट यांचा सत्याग्रहाविषयींचा मतभेद या लेखांत पूर्वीच नमूद करण्यांत आला आहे. त्या बाबतींतही सत्याग्रहाच्या चळवळीचा भलतेच लोक फायदा घेऊन अस्वस्थता उत्पन्न करितील हें मिसेस बेझंट यांचें भविष्य खरें ठरलें. महात्मा गांधी यांनी आपल्या सत्यनिष्ठ स्वभावास अनुसरून असें सार्वजनिक रीत्या कबूल केलें आहे कीं, जनसमूहामध्यें कुमा- गवृत्ति किती आहे याचा जो मीं अजमास केला होता तो चुकीचा ठरला. आणखी एका बाबतींतही याचप्रमाणे मिसेस बेझंट यांचे धोरण खरें ठरल्याचा अनुभव नुकताच आला आहे. गेल्या वर्ष सब्यावर्षभर जे लोक