पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/86

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचे परिणाम पुढील अनेक पिढ्यांना भोगायला लागतात. म्हणून प्रत्येक मुलाच्या आयुष्याची सुरुवात शक्य तेवढी उत्कृष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. हे करत असताना एकाही मुलाचा अपवाद केला जाणार नाही हे कटाक्षाने पाहिले जाईल. संयुक्त राष्ट्र बालक निधीचे हे धोरण बालकांविषयीच्या असाधारण आस्थेचेच द्योतक होय. हे करताना प्रत्येक मुलास दर्जेदार मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याच्या सुप्त गुणांना वाव देण्यावर, संधी देण्यावर भर दिला जाणार आहे. जग रोज युद्धाच्या सावलीखाली झाकोळत असून या सावल्या रोज गडद व लांब होत आहेस. ११ सप्टेंबर, २00१ च्या हल्ल्याने तर युद्धाच्या ढगांनी सारे जगच आच्छादल्यासारखी स्थिती होऊन बसली आहे. आपण पूर्वपिढीचे लोक एका अर्थाने भाग्यवान आहोत. अशा सावल्या आपल्या अंगावर नाही पडल्या. पण या सावल्या निर्माण करण्याचे अपराधी मात्र आपणच आहोत, हे विसरून चालणार नाही. म्हणून या अहवालात नेल्सन मंडेलांचे जगातल्या अशा मुलांना आश्वस्त करणारे एक हृदयद्रावक पत्र आहे. त्यात ते म्हणतात, माझे बालपण जसे गेले तसेच बालपण तुम्हाला मिळो असे वचन मी तुम्हाला देऊ शकलो असतो, तर दिले असते....पण मी तुम्हाला जे मला देता येणे शक्य आहे, त्याच गोष्टीचे वचन देईन. मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी बालपणापासून जे शिकलो तेच करत राहील. लहान असल्यापासून मला अशीच शिकवण मिळाली आहे की, बालकांच्या-तुमच्या हक्कांचे रक्षण । केले पाहिजे. तुमचा विकास होण्यासाठी मला माहीत असलेल्या सर्व मार्गांनी मी दररोज प्रार्थना करीन. मी स्वतः तर तुमचा आवाज नि मते ऐकतोच, पण इतरांनाही ऐकायला लावेन. मुलांसाठीच्या जागतिक सहकार्यांतर्गत असेच वचन सशस्त्र युद्धविषयक तज्ज्ञ, मोझांबिकच्या माजी शिक्षण मंत्री ग्रेसा माशेलनी दिले आहे. त्या म्हणतात, “मी तुम्हाला वचन देते की, आपला इतिहास जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळावी, तुमची कल्पनाशक्ती बहरून यावी, आप्तजनांच्या कथा तुम्ही सांगाव्यात. मी तुमच्या शिक्षणासाठी कार्य करीन. प्रथमत: ज्ञान आणि अभ्यास यामुळे मिळणाच्या स्वातंत्र्याशी तुमची मी ओळख करून देईन. | असे वचन नि आश्वासन देण्याची पाळी पूर्व पिढीवर आली. त्यामागे एक विदारक सत्य आहे. श्रीलंका, नेपाळ, जमेका, मॅसिडोनिया, युगोस्लाव्हिया, कोसावो, मालदीव, टर्की, भारतासारख्या विकसनशील संकटग्रस्त देशातच मुलांचे 'वात्सल्य धोक्यात आहे असे नाही. अमेरिका, फ्रान्ससारखे प्रगत देशही यास अपवाद नाहीत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. श्रीलंकेतील वंचित विकास जग आणि आपण/८५