(e) अँईल इंजिनची माहिती. नाहीं. तर उगाच बेरीज फार मोठी होऊनं तेवढया शक्तीचें इंजिने घेतले तर किंमत फुकट जास्त पडेल. कारण तेवढी सर्व शक्ति लागणार नाही; ह्मणून जितकीं यंत्रे एकदम चालवावयाचीं असतील त्यांच्या शक्तींची बेरीज करावी. एखादें यंत्र पुढे मागें ज्यास्त घालवाक्याचें असल्यास स्याचाही शक्ति त्यांत मिळवावी यांतच पट्याचे व शाफ्टींगचे घर्षणांत फुकट जाणारी शक्ति मिळवावी. ही दर दहा हॉर्सपॉवरला एक एक हॅसैपॅीवर अशी मिळवावी. ह्या रकमेला ४ ते १’ या रकमेनें गुणावें व जो गुणाकार येईल त्या शक्तीचें ब्रेक हॉर्सपॅींवरचें इंजिन घ्यावे. हें सर्व लिहिण्याचें कारण कारखानदार किंवा इंर्जिन विकणारा जी ब्रेक हॉर्सपॉवर सांगतो ती इंजिनच्या योगानें मिळणारी ज्यास्तींत ज्यास्त शक्ति होय. एवढया शक्तीवर इंजिन कधीं चालवू नये. कारण प्यामुळे त्यावर फार भार येऊन (लोड येऊन) इंजिन फार गरम होण्याचा व त्यामुळे लवकर बिघडण्याचा संभव असतो.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/18
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही