भाग तिसरा. re->83-tra हूँजिन कर्से चालर्त. ज्या तत्वावर ऑईल इंजिन बनविलेलें असतें त्याला आटो सायकल किंवा फोर सायकलचें तत्व (Principle ) असें ह्यणतात. आष्टी सायकल ह्मणण्याचें कारण त्या तत्वावर बनविलेलीं इंजिनें पहिल्यानें आटो नांवाच्या माणसानें बनविलीं. फोर सायकल ह्मणण्याचें कारण सायकल (चक्र) पुरें होण्यास चार स्ट्रोक व्हावे लागतात. इंजिनच्या दरएक फे-यामध्यें पिस्टनचे दोन स्टोक होतात. एक पिस्टन पुढें जातो तेव्हां; व एक पिस्टन मार्गे' येतो तेव्हां दर सायकलमध्यें इंजिनचे दोन फेरे होतात. डझिल इंजिनही फोर सायकलचे तत्वावरच बनविलेलें असतें. याशिवाय आणखी दोन त-हा दूसायकल व सेमि डीझल ह्मणून आहेत. त्यांचें वर्णन पुढें एका निराळ्या भागांत करूं. वर जें फोर सायकलचें तत्व (Principle) ह्मणून सांगितलें त्याची क्रिया पुढे लिहिल्याप्रमाणें असते. पहिल्या स्ट्रेकच्या वेळेस' जेव्हां पिस्टन पुढें जातो तेव्हां सिलिंडरमध्यें तेलाची वाफ व हवा याचें मिश्रण येतें. दुसया स्टोकच्या वेलेस पिस्टन मागें जातों तेव्हां हें मिश्रण दाबलें जातें. तिस-या स्टोकच्या सुरवातीला या मिश्रणाचा स्फोट होतो व पिस्टन जोरानें पुढें ढकलला जातो. चवथ्या स्ट्रोकच्या वेळेस पिस्टन पुन्हां मार्गे येतो तेव्हां हे जळलेले वायू निघून जातात. या नंतर पुन्हां पिस्टन पुढें येतो तेव्हां तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण सिलिंडरमध्य येतें. या प्रमाणें ही सायकल किंवा चक चालू असतं. इंजिन कसल्याही त-हेचें असलं तरी त्यांत ही चक्राकार क्रिया (Cycle ) सारखी चालू असते. दूसायकलच्या इंजिनामध्यें ही क्रिया दोन स्ट्रेक मध्यें आण लेली असते इतकेंच. या चार स्ट्रोकना त्या प्रत्येकाचे वेळेस जे कार्य होतें त्यावरून त्या त्या कार्यांचींच नावें दिली आहेत. तीं नावें आणि प्रत्येकाचें कार्य या संबंधानें जास्त खुलासवार वर्णन करितों. पहिला सक्शन स्ट्रोक. या स्ट्रोकच्या वेळेस तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण सिलिंडर मध्यें येतें. याला सक्शन स्ट्रोक ह्मणण्याचें कारण कांहीं इंजिनमध्यें पिस्टन पुढें जातानां जी ओढ लागते तिच्या । योगानें तेलाची वाफ सिलेंडरमध्ये येण्याचा व्हालव्ह उघडतो. ही तेलाची वाफ सिलेिंडरच्या पाठिमागेंच त्याला जोडलेली एक पेटवजा किंवा दुस-या आकाराची कांहीं रचना करून बसविलेली असते त्यांत होत असते. त्याला व्हेपोराईझर (वाफकरणारे) खणतात. दुसृा कंम्प्रेशन स्ट्रक. कम्प्रेशन ह्मणजे दाब. वर जें འི་
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/19
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही