ऑईल इंजिनची माहैिती. ( ፪oፋ ) इंजिनमध्यें फत एक नीडल व्हालव्ह ( सुईसारखा। बारीक टोंकाचा ) बसविलेला असतो. यांत व्हालव्ह उघडावा तितकेंच तेल जातें; पण हा व्हालव्ह वारंवार साफ करावा लागतो. दुसरी त-हा पंपच्या योगानें तेल पुरविण्याची. हिच्या योगानें व्हेपेोराइझरमध्यं तेल सारखें जात असतें, कमीज्यास्त होत नाहीं. तसेंच तेल कमी जास्ती लागेल तसें सोडतां येतें. ऑईिल पंप हे बहुधा गठहरनरच्या योगानें कंट्रोल केले जातात. ( ताब्यांत ठेवले जातात.) जेव्हां इंजिनची गती वाढते तेव्हां एक वेळ जरुर असल्यास जास्त वेळ व्हेपोराइझरमध्यें तेल जाण्याचें बंद होतें. यामुळे इंजिनमध्ये एक्सप्ट्रोजन ह्मणजे स्फंट होत नाही व इंजिनची गती वही होते. योग्य गतीवर इंजिन आलें ह्मणजे पुन्हां तेल व्हेपेराइझरमध्यें जाऊँ लागतें. कांहीं इाजनांमध्यें पंप सारखा चालू राहून दुस-या एका लहान रिझव्हायरमध्यें तेल जातें व तेथून व्हेपीराइझरमध्यें जातें. रिझव्हायर मध्यें जास्त झालेलें तेल दुस-या एका नळीनें टाक्यांत परत येतें. तिसरी त-हा सक्शनची ( ओढीची ). पिस्टन पुढे जातांनां सक्शन स्टीकच्या वेळेस जी ओढ लागते तिचे योगानें तेल व्हेपेोराइझरमध्यें जातें. ह्या त-हेच्या इंजिनमध्यें एक व्हेपरव्हालव्ह असतो व तो गव्हर्नरच्या कंट्रोल खालीं असतो, व जेव्हां एक्सप्लोजन व्हावयाचा असेल त्यावेळेस उघडतो. सक्शन स्टोकच्या वेळेस जेव्हां व्हेपोराइझरमधील तेलाची वाफ सिलिंडरमध्यें जाते तेव्हां तेलाच्या टांकाला जोडणा-या नळीमधून तेल व्हेपोराइझरमध्यें येतें. एक साधा बुईग व्हालव्ह तेल परत न यावें ह्मणून लाविलेला असतो. तसेंच इंजिन चालू कारोतानां कनेकटिंग पाईप जोडण्याची व त्यांत तेल भरण्याची व्यवस्था केलेली असते. कांहीं इंजिनमध्यें स्कूच्या योगानें इंजिनमध्यें जाणारें तेल कमीज वास्त करितां येतें. कांहीं इंजिनमध्यें हवा सिलिंडरमध्यें जाण्याचें द्वार कमीजास्त उघडलें जातें. काहीं इंजिनांमध्यें तेल व हवा यांचें प्रमाण आपोआप बदलत असतें. असल्या इंजिनमध्यें कमीजास्त जोराचे पण केव्हांही न थांबतां एक्सप्छेोजन (स्फेट) होत असतात.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/27
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही