ऑईल इंजेिनची आहिती. ( ? % ) जास्त खर्च होतें. शिवाय व्हेपोराइझरमध्यें तयार होणारें हें मिश्रण भडकण हैं ( इन्फ्रे मेबल) असल्यामुळे काम्प्रेशन पुरें होण्याच्या अगोदरच पेटतें व एक्सठोजन होती. असें होणें चांगलें नाहीं: त्यासुकें पिस्टनवर धका बसती. असलों इंजिनें वारंवार साफ करावीं लागतात. यांच्या व्हेपोराइझरमध्यें घाण फार तुंबते. त-हा दुसरी, ज्यांत तेल व थोडी हवा व्हेपोराइझरमध्यें घेऊन बाकीची हवा सिलिंडरमध्यें घेतात तो. हिचा फायदा असा आहें कीं यांत हवेचें प्रमाण कमी असल्यामुळे व्हेपोराइझरमधून हें मिश्रण सिलिंडरमध्यें जात असतां पेटण्याची धास्ती नसते. तसेंच कॉम्प्रेशन पुरें होण्याच्या अगोदर एक्सप्ठोजन होत नाहीं. शिवाय। पहिल्या त-हेपेक्षां यांत कॉम्प्रेशन जास्त चांगलें जोराचें होतें. यांत घाण कमी बाजते. हीं इंजनें जाड ज्याला कूड ऑईल ह्मणतात त्यार्नेही चालवितां येतात. था इंजिनमध्यें जास्त व्हालव्ह व जास्त भाग असतात. ते वांरंवार तपासून नीट जा ग्यावर बसवावे लागतात. लोड पूरें किंवा बरेंच असलं तर हीं दुस-या त-हेचीं इंजनें चांगलीं चालतात. लोड कमीं असेल तर पहिल्या त-हेचीं इंजिनें जारत चांगलीं फायदेशीरपणें चालतात. त-हा तिसरी, ज्यांत तेल व्हेपोराइझरमध्यें व हवा सिलिंडरमध्यें घेतात ती. डीझेल किंवा सेमी डीझेल जातीच्या इंजिनांत अशी व्यवस्था असते. असल्या त-हे- च्या इंजिनांनां व्हेपोराइसर फार करून निराळा नसतो. या त-हेच्या इंजिनांत सक्शन स्ट्रोकच्यावेळेस नुसती हवा सिलिंडरमध्यें येऊन ती काम्प्रेशन स्ट्रोकच्यावेळेस दाबली जाते. डीझल इंजिनमध्यें हा दाब दर चौरस इंचाला ७०० ते ८०० पौंड असतो व या दाबामुळे सिलिंडरमध्यें सोडलेली हवा इतकी तापते कीं तींत तेल सोडलें असतां तें आपोआप पेटतें. हें तेल लाड कमीजास्त असेल श्या प्रमाणें कमांज्यास्त वेळ सोडतात. या दोन्ही डोझल किंवा सेमी डोझल इंजिनमध्यें कूड ऑईल वापरतात. या इंजिनांत हवा जरूरीपेक्षां जास्त येत असल्यानें तेल सर्व साफ जळून जातें यामुळे घाण कमी बाजते. डीझल ऑईल इंजिन चालू करण्यासाठी तापवावें सुद्धां लागत नाहीं, पण तें चालू करण्यास स्टार्टर लागतो. सेमी डीझल इंजिनमध्यें हवा दीडशें ते पावणे दोनशें पौंड पर्यंत दाबली जाते व मग पॉवर स्ट्रोकच्या सुरवातीला यांत तेल सोडतात; पण हें चालू करण्याचे अगोदर व्हेपेोराइक्षर तापवावा लागतो. चालू झालें ह्मणजे दिवा वगैरे कांहीं लागत नाहीं.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/31
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही