पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेलाच्या नळ्या जोडणे. आपल्याकडे तेल चार ग्यालनच्या चौकोनी डब्यांत मिळतें किंवा वाटोळे ड्रमही मिळतात. मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरीं गाड्यांवरून मोठमोठीं पिपें आणून त्यांतून मिळतें व तें बरेंच स्वस्तही पडतें. जर कोणाला डबे वगैरे न ठेवतां मोठा टांकाच ठेवावयाची असेल तर तो उंचावर ठेवावी व त्यापासून बेडच्या टॅकपर्यंते एक नळी लावावा. हा नळी पितळेची किंवा तांब्याची असावी व तिला होता होईतों सांघा असू नसे. तसेंच तिला एक काक वसवावा. पिंपावर ऊन पहुं देऊं नये. पिंपांत तेल किती आहे हें समजण्याकरितां त्याला एक इंडिकेटर किंवा फ्रीट लावावा. पिंप उंचावर असलें ह्मणजे काक उघडल्याबरोबर तेल टांक्यांत येईल. यांत तेल भुळींच फुकट जात नाहीं. इंजिन बरोबरच तेलाचे टांक्यापासून व्हपोराइझरला जोडणा-या नळ्या मिळतात. प्रत्येकजण त्याला वाटेल त्या आकाराच्या नळ्या करितो. ह्यावद्दल नियम कांहींच नाही. सांधे बसवितांनां ते चांगले घट्ट वसवावे. त्यांतून हवा जाण्यास मुळीच फट राहूं देऊं नये. जमिनीजवळचे सर्व सांधे धातूला धातू लवून करावे. ह्मणजे दोन्ही तोंडांमध्यें प्याकिंग पेपर वगरे कांहीं घालू नये. सांध्याचीं तोंडें घका DBDDD DDDKD DDD DD DK KDDDS DDD DDD DDD DD DDDS सांध्यांतून तेल गळतां कामा नये तसेंच त्यांतून आवाजही होतां कामा नये.