HO पोर्टेबल ऑईल इंजिन. या भागापर्यत जें सर्व सांगितलें तें जमिनीवर ह्यणज एका जाग्यावर बसविलेल्या ऑईल इंजिन संबंधीं होय. या भागांत पोर्टबल ह्मणजे गाडीवर बसविलेल्या इंजिन संबंधों लिहितो. पोर्टेबल ऑईल इंजन झणज गाडीवर बसविलेलें ऑईल इंजिन. याचा मोठा फायदा असा आहे कीं तें वैल लावून लागेल तिकडे नेतां येतें याचा फायदा शेतकरी लोकांनां तसेंच ज्याला इंजिनचें काम निरानराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या वेळीं लागतें अशा लेौकानां आहे. शेतकरी लोकांचा ক্ষাত্মৰা असा आहे कीं एकच इंजिन पुष्कळ जणानां वापरतों येतें यामुळे खर्च थोडा पुरंतो. यार्न पंप वगैरे चालवितां येतात; तसेंच भ्राशर पंखा बेलर वगैरे यंत्र हीं आपणास कामाला योग्य अशा निरनिराळ्या ठिकाणीं ठेवलीं असली तरी त्या ठिकाणी इंजिन नेऊन चालवेितां येतात. कनालवरच्या उंखाच्या मळ्यांत चरक चालविण्यास याची फारच मदत आहे. | कारण त्याचे बरोबरच एक दुसरा पोटॅबल लोखंडी चरक ठेवून पुष्कळ लोकांना याचा फायदा घ्यावयास सांपडेल. कारण बैलांच्या चरकानें शक्तीनें घालणा-या चरका इतका पुष्कळ व लवकर रस निघंत नाहीं तवेंच त्यास माणसेंही जास्त लागतात. आण बैल दुस-या कामास लावतां येत नाहीत. तसेंच बैलाचा चरक पुष्कळ वेळ अगोदर चालू करावा लागतो तितका वेळ अगोदर चालू करावा लागणार नाही. यास , बसविण्याची ही खटपट नाही. जर पोर्टेबल इंजिन व चरक एकानें घेऊन । त्यांनें भाड्यानें दिला किंवा पुष्कळ जणांनीं मिळून घेतला तर त्या सगळ्यांनांही फायदा होईल, *,=, = , पोर्टेबल इंजिन व बसविलेलें इंजिन यांचे तत्वांमध्यें मुळीच फरक नाहीं मांत्र रचनेंत थोडासा फरक असतो. हें इंजिन लोखंडी बीमांच्या केलेल्या फ्रेमवर बसविलेलें असतें. या इंजिनबरोबरच पाण्याची टांकी असते ती बहुतकरून फ्रेमच्या खालच्या बाजूला बसविलेली असते. पाण्याची टांकी लहान असल्यामुळे पाणी निवावण्याची कांहीं तरी योजना केलेली असते.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/72
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही