ऑईल इंजिनची माहिती. ( V9ኳ) बहुतकरून दोन फ्रायव्हीलस् असतात. त्यांचेमुळे गति सारखी राहून बेअरिंगही सारखे झिजतात. या इंजिनचा बेडलेट चांगला भकम असून सिलिंडरही त्याबरोबरच ओतलेला असतो. या इंजिनची मेन बेअरिंग रिंग बेअरिंगच्या जातीचीं असतात. ह्मणजे वेअरिंग रिंगनाँ तेल जातें. पिस्टन गजनपिन कॉकपिन वगैरेनां साईटफीड छत्रिकेटरनें जातें. यामुळे ते नीट जाऊन फार लागत नाही. या इंजनचा व्हेपोराइझर अगदीं साधा असतो व तो साफ करण्यास फार त्रास पडत नाहीं. या इंजिनचे मुंबईचे एजंट राजा आणि कंपनी हे आहेत. यांशिवाय दुसरीं चांगल्यापैकीं टळक ठळक इंजिनें ह्मटलीं ह्यणजे कासली हार्नस्बी पीटर हीं आहत यांपैकीं क्लटन हें दोन सायकलचे तत्वावर बनावेलेलें असून आडवें असतं. हटन ऑईल इंजिन. हें एक चांगल्यापैकीं इंजिन आहे. हें टू सायकलच्या तत्वावर बनावलेलें आहे. हैं इंजिन आडवें असतें यामुलें पिस्टन वगैरे काढण्यास व बसविण्यास फारच स्रोपें जातें हें इंजन कूड ऑईलनें चालतें. त्यास जागा फारच थोडी पुरते, या इंजि नचा गव्हरनर क्रांक शाफ्टवरच बसविलेला असतो त्याचे योगानें इंजिनमध्यें लोड• प्रमाणें तेल कमी आधक जातें. या इंजिनला दीन फ़ायव्हील असतात. " हें इंजिन सगळया बाजूनों अगदीं बंद असतें. क्रांकवरसुद्धां अगदीं बंद केलेलें झांकण असतें. यामुळें हें इंजन कुळेंही अगदीं निर्धास्तपणें चालवितां येतें. हवेंतील धुरळ्याचा किंवा दुस-या कसल्याही गोष्टीचा, याचेवर मुळीच परिणाम होत नाही. याचा हबेचा व्हालव्ह हा क्रांकवरच्या झांकणावर बसविलेला असतो. हें इंजेिनव्हालव्ह स्प्रिग वगैरे कांहीं नसल्यामुळे फारच सार्धे असतें. ह्याचा पिस्टन वारंवार काढून साफ करावा लागत नाहीं. त्या ऐवजीं जाकेटवरचें झांकण काढून इंजिन फिरवून पुढे घ्यावें व पिस्टनवरील रिंगावर राकेल ओतून प्या हलवाव्या. हैं इंजिन लागेल तसें उलठ्या किंवा सुलठ्या बाजूतें फिरवृन चालू करती येतें. यामुळे पट्टा केव्हांही कास ह्मणजे ज्याचे योगानें इंजिनची गति व यंत्राची गति विरुद्व करतां येते असा घालावा लागत नाहीं व असा पड़ा न घालणें हैंच चांगलें,
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/89
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही