या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंपरा आहेत, कलांचे विवेचन आहे ही गोष्ट विसरली जाते. भारतीय साहित्यशास्त्रातील रससिद्धांत हा ग्राह्य ठरवायचा की अग्राह्य ठरवायचा, हा अगदी निराळा प्रश्न आहे. पण तो सिद्धांत निव्वळ वाङमयविवेचनाचा सिद्धांत नव्हे. प्राचीन भारतीयांच्या मते हा सगळ्याच कलांना लागू पडणारा निदान शिल्प, चित्र, नृत्य, नाट्य, काव्य आणि संगीत या कलांना लाग पडणारा असा तो सिद्धांत आहे. पाटणकरांनी भारतीयांच्या या काव्यसमीक्षेचाही पुरेसा आदराने विचार केला आहे. संस्कृत साहित्यशास्त्राच्या परंपरेचे वृथा उदात्तीकरण आणि समर्थन करण्यास प्रतिज्ञाबद्ध नसलेल्या आधनिक विचारवंतांनी हे विवेचन वेगळया दृष्टीने तपासले पाहिजे. भारतीय साहित्यशास्त्रही ग्रीकांच्या साहित्यशास्त्राप्रमाणे असे प्रश्न उभे करते,-ज्यांची उत्तरे समाधानकारकरीत्या त्यांनाही देता आली नाहीत. कदाचित आपणालाही देता येणार नाहीत. पण तरीही हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मढेकरांचा संस्कृत साहित्यशास्त्राशी परिचय फारच अपुरा होता. पाटणकरांनी ह्यादष्टीने एक चांगला आरंभ केला आहे हे मान्य केलेच पाहिजे. हा सगळा पाटणकरांच्या पुस्तकाचा अतिशय त्रोटक आणि स्थूल असा परिचय आहे.
 तो कुठे तरी थांबायला हवा. एक तर अतिशय खोलात जाऊन कला क्षेत्रातील समस्यांचे विवेचन करणा-या सुमारे चारसे पन्नास पाने एवढा आकार असलेल्या ग्रंथाचा थोडक्यात परिचय करून देता येणे शक्य नाही. आणि दुसरे म्हणजे नुसताच परिचय करून देणे इथे अभिप्रेतही नाही. पाटणकरांनी आपल्या विवेचनात जे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांची संक्षेपाने तपासणी जरी करायची म्हटले तरी एक पुस्तक लिहावे लागेल. तसे पुस्तक परीक्षणाच्या रूपाचे लिहण्याचा माझा विचार नाही. या परीक्षणात काही ठळक बाबींकडे लक्ष वेधणे एवढेच शक्य आहे. तेच करून मी थांबणार आहे. बाकी ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे व मौलिक चिंतनाने भारलेला आहे याची नोंद वर आलेलीच आहे.

 सौंदर्य म्हणजे काय? या प्रश्नापासून पाटणकरांनी आपल्या विवेचनाला आरंभ केलेला नाही. कारण असा आरंभ करून आपण फारसे काही साध शक असे त्यांना वाटत नाही. प्रत्यक्ष कलासमीक्षेत ज्या संकल्पना उस्फूर्तपणे वापरल्या जातात त्यांचे विश्लेषण करणे हे सौंदर्यशास्त्राचे प्रमुख कार्य आहे असे त्यांना वाटते. सौंदर्यविषयक जाणिवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नसून सौंदर्यविषयक ज्या जाणिवा समाजजीवनात अस्तित्वात आहेत त्यांची संगती लावून देणे आणि त्यांना स्पष्टता देणे हे कलामीमांसाचे काम आहे. पाटणकरांची ही भूमिका त्यांच्या एकण विवेचनाचे स्वरूप निश्चित

ओळख

९१