या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवहारातून सिद्ध होत असतात हे लक्षात घ्यावे लागते. या निकषावर कलांचा अनुभव श्रेष्ठ ठरला तर ती श्रेष्ठता जीवनसापेक्ष असते. जर आपण कलात्मक अनुभव लौकिक अनुभवापेक्षा श्रेष्ठ आहे असे नसून फक्त वेगळा आहे अशी भूमिका स्वीकारली ( आणि हीच भूमिका पाटणकरांनी स्वीकारली आहे.) तर मग लौकिक अनुभवापेक्षा निराळया असणा-या या अनुभवाचे जीवनात महत्त्व काय ? याचे उत्तर द्यावे लागते. जर सौंदर्यानुभव आणि कलानुभव यांना जीवनात काहीच महत्त्व नसले तर मग हे व्यवहार अस्तित्वात असून समाजाला उपयोग नसतो. हे व्यवहार संपूर्णतया नामशेष होण्यात समाजाची हानीही नसते. टॉलस्टायने ओबडधोबडपणे स्पशिलेला एक प्रश्न कलांच्या संदर्भातच महत्त्वाचा आहे.
 कलात्मक व्यवहार जिथे चालतो त्याच्या शेजारी एक लौकिक व्यवहार चालू असतो. कुमार गंधर्वाचे गाणे ऐकण्यासाठी ५ रु. चे तिकिट काढून एक माणूस जात असतो. कुमार गंधर्वांच्या गाण्याची किंमत ५ रु. असे काही या श्रोत्यांचे मत नसते. कुमार गंधर्वाचे गाणे ऐकणे हा एक अनुभव आहे. या अनुभवाचे मोल पैशात करताच येणार नाही असेच त्या रसिक श्रोत्याचे मत असते. पण त्या अनुभवाची किंमत पैशात जरी करता आली नाही तरी तो अनुभव महत्त्वाचा आहे. त्या अनुभवाच्या प्राप्तीसाठी कष्टातून मिळवलेला लौकिक व्यवहाराला उपयोगी पडणारा पैसा खर्चणे रास्त आहे असे त्या रसिकाचे मत असते. लौकिकाच्या दृष्टीने जे विविध प्रकारे उपयोगी पडते आहे अशा कोणत्यातरी वस्तूचा त्याग कलात्मक अनुभव घेताना करावाच लागतो. आणि नेहमीच हा विनियोग माणसाच्या जातीने समर्थनीय मानला आहे. जे उपयोगी आहे त्याच्या मोबदल्यात जिथे उपयोगितेची कसोटी लाग पडत नाही पण जे महत्त्वाचे आहे ते प्राप्त करणे माणसाला महत्त्वाचे वाटते हा संस्कृतीचा व्यवहार आहे. असल्याप्रकारचा व्यवहार कलांच्या पुरता मर्यादित नाही. कलांची निर्मिती, कलांचा आस्वाद, कलाकृतींची जपणक ही महत्त्वाची आहे असे माणस का मानतो ? या प्रश्नाचे कोणते तरी उत्तर द्यावेच लागते.

 सौंदर्याची जाणीव ही प्राणिसष्टीतून माणसांकडे वारसा हक्काने चालत आलेली जीवनशास्त्रीय जाणीव आहे काय ? कारण मानवेतर सजीव सृष्टीही रंग, गंध, नादावर लुब्ध होत असते. म्हणूनच कबुतरांना घुमणे असते, मोरांना पिसारे असतात, फुलांना रंग असतो. मूलतः सौंदर्याची जाणीव प्राणीसष्टीत जन्मणारी जीवशास्त्रीय जाणीव आहे. माणसाने जीवशास्त्रीय जाणिवांचा विकास केला आहे. तसा सौंदर्य जाणिवेचाही विकास केला आहे अशी भूमिका घेता येईल. पण ही भूमिका घेतल्यानंतर सौंदर्य हे उपयोगितेच्या परिघा

१०४

ओळख