या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रौढपणी केलेले आहे. समीक्षक म्हणून आपला काही मराठवर प्रभाव आहे असे कोल्हटकर मानीत नव्हते की काय? मराठी नाटकांच्या क्षेत्रात त्यांना युगप्रवतक मानले जाते. ते कोल्हटकरांना मान्य नव्हते की काय ? कल्पनाविलास व शाद्विक कोट्या ह्यांनी जखडून गेलेली भाषाशैली ह्यापेक्षा मराठी नाटकांना आपली काही निराळी देणगी आहे असे त्यांना वाटत नव्हते की काय? आपल्या संप्रदायाच्या विशेष आरंभी अमूक होते नंतर तमूक होते हे सांगून आपलाच संप्रदाय बदलत गेला असे त्यांना म्हणावयाचे आहे की काय? असे अनेक प्रश्न ह्या विधानामुळे निर्माण होतात.
 गडकरी हे उत्कट भावनाविलासाचे लेखक आहेत ही भावनेची उत्कटता त्यांना इतकी आवडली आहे की त्यामागे लागताना ते पूष्कळदा अतिरेकी, भडक व नाटकी पण समहमनाच्या दृष्टीने अतिशय प्रभावी व परिणामकारक लिखाण करतात. त्यांची कल्पकता ह्या भाव प्रदर्शनाची सहकारिणी असते. गडकरी स्वतःला कोल्हटकरांचे शिष्य समजत व ते कोल्हटकर संप्रदायाचे एक नेतेही मानले जातात. गडक-यांविषयी कोल्हटकर गुरुजींचे मत असे आहे की गडकरी वाङमयात त्यांची नाटके सर्वांत निकृष्ट आहेत. त्यापेक्षा विनोदी लेख सरस आणि सर्वात सरस कविता आहे. नाटकांमध्येसुद्धा भावबंधन हे नाटक त्यातल्या त्यात बरे. वाकीची नाटके सर्वात तर अधिकच टाकाऊ आहेत. हेही गडक-यांची लोकप्रियता शिखरावर असतानाचे कोल्हटकरांचे मत आहे. कोल्हटकरांची वाङमयीन समज किती ह्यावर प्रकाश टाकणारी ही भूमिका. ह्याचा एकत्र विचार आपण करू लागलो तर निर्णय असा घ्यावा लागेल की, ह्या ज्येष्ठ समीक्षकाजवळ व्यासंग खूप होता. जाणकारी त्यामानाने फार थोडी होती. करंदीकरांनी हा निर्णय सौम्यपणे सांगितला आहे आणि तो नव्याने विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

 कोल्हटकर हे सामान्यपणे सुधारक व पुरोगामी लेखक मानले जातात. त्यांच्या सुधारणावादाचा व पुरोगामीपणाचा आवाका किती हयाचाही एकदा विचार व्हायला हवा. न्या. रानडे यांच्या सुधारणावादाचे कोल्हटकर हे चाहते. ते स्वतः पनविवाहाचे समर्थक पण पुनर्विवाहासंबंधी कोल्हटकरांचे मत काय? पुनविवाह निंद्य नसून न्याय्य आहे असे त्यांना वाटते. पण तो अनुकरणीय व उदात्त आहे असे मात्र त्यांना वाटत नाही. श्रेष्ठ धीरोदत्त नायिकेने स्वीकारण्याजोगा हा मार्ग आहे असे त्यांना वाटत नाही. ही भूमिका काळजीपूर्वक समजन घेतली पाहिजे. जर नायिका श्रेष्ठ चारित्र्याची असेल तर तिने वैधव्य सहन केले पाहिजे. गत पतीच्या स्मतीच्या आठवणीवरच जीवन व्यतित केले पाहिजे. ही गोष्ट अनुकरणीय, कित्त्यादाखल ठेवण्याजोगी. पण व्यक्तिमत्त्व इतके श्रेष्ठ

.ओळख

१०९